purepolitics24@gmail.com

जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’

जालना  परभणी येथील जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार संजय जाधव यांनी’ किती दिवस सहन करायचं ,किती दिवस शांत बसायचं.  माकडीन  सुद्धा वेळ आली की पिल्लू पायाखाली घालते, तर वेळच  आली तर राष्ट्रवादीचेही  तसे  करू. असे वक्तव्य केल्याने …

जिल्हाधिकारी बदलण्यावरून राष्ट्रवादी – शिवसेनेत होणार ‘कलगीतुरा’ Read More »

‘त्या’ विधेयकाला विरोध करू नका;देवेन्द्र फडणवीसांचे ‘साकडे’ !

नवी दिल्ली एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार हे राज्यांनाच  असावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे आणि राजकीय पक्षांना संसदेत ‘ त्या ‘ विधेयकावर गदारोळ करू नये अशी  विनंतीही केली आहे. दिल्लीतील भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,  102 व्या  घटना दुरुस्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार …

‘त्या’ विधेयकाला विरोध करू नका;देवेन्द्र फडणवीसांचे ‘साकडे’ ! Read More »

सप्टेंबर अखेरपर्यंत पुण्यातील प्रभागरचनेचे चित्र होणार स्पष्ट !

पुणे प्रतिनिधी  आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सप्टेंबर अखेरपर्यंत  प्रभाग रचनेचे  चित्र स्पष्ट होणार आहे.  तत्पूर्वी प्रभाग एक सदस्य की द्विसदस्यीय  यावर येत्या पंधरा दिवसात  महाविकास आघाडी सरकारकडून  निर्णय होणार  आहे. परिणामी ‘सोई ‘चा प्रभाग मिळतो कि, नव्याने रणनीती आखायची यासाठी इच्छुकांनी जोरदार  तयारी चालवली आहे. त्यातही आरक्षण पडले तर काय ? त्यासाठीची व्यूहरचनाही इच्छुकांकडून आतापासून  आखली जात …

सप्टेंबर अखेरपर्यंत पुण्यातील प्रभागरचनेचे चित्र होणार स्पष्ट ! Read More »

१५व्या दिवशीही ‘ त्या ‘प्रकरणावरून रणकंदन!

नवी दिल्ली संसदेच्या   अधिवेशनाचा आज पंधरावा दिवस.  मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील चर्चा यावर एकमत होत नाही.  विरोधकांना पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु करायची  आहे तर सरकारला या मुद्द्यापासून फारकत घ्यायची ,असेच चित्र सध्या आहे. दररोज दोन्ही सभागृहात विरोधक गोंधळ घालत आहेत.  परिणामी दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागत आहे.  विरोधी पक्षांनी एकत्र येत …

१५व्या दिवशीही ‘ त्या ‘प्रकरणावरून रणकंदन! Read More »

राज्यपालांनी पत्रकारांनाच केला ‘हा’ उपरोधिक सवाल

नांदेड मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही.  मी माझ्या अखत्यारित असलेल्या विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि मला तेवढा संविधानाने अधिकार दिला आहे.  अशा शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भूमिका मांडली मात्र राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे, ते त्यांना करू द्या.  परंतु पत्रकार तर राजकारण करत नाही ना असा उपरोधिक सवालही त्यांनी पत्रकारांनाच  केला. राज्यपाल …

राज्यपालांनी पत्रकारांनाच केला ‘हा’ उपरोधिक सवाल Read More »

राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला!

पुणे प्रतिनिधी महाराष्ट्रात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासविण्याचा राज्यपालांचा प्रयत्न आहे का ? अशी टीका राज्यपालांच्या दौऱ्यावरून होत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे निष्ठावंत असल्याचा दाखला दिला आहे. परिणामी या वक्तव्यामुळे भाजप कोंडीत सापडण्याची दाट शक्यता आहे. राज्यपालांच्या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारने कडाडून …

राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला! Read More »

ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले!

पुणे  बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून असते मात्र या शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे गत ४०० वर्षांची परंपरा तसेच पशुगणनेत कमी होत असलेल्या  खिलार जातींच्या बैलांची संख्या या पार्श्वभूमीवर बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे   करून पाठपुरावा सुरु ठेवला …

ग्रामीण भागाचे अर्थचक्र :बैलगाडा शर्यतीसाठी ‘ते’ पुन्हा सरसावले! Read More »

विरोधकांसमवेत राहुल गांधींची ‘ब्रेकफास्ट मीट’ तर पवारांची ‘साखरपेरणी’!

नवी दिल्ली   विरोधीपक्षांकडून  केंद्रसरकार विरोधात एकीची मोट बांधली जात आहे.त्यानुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’  आयोजित केली असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र नव्याने निर्माण झालेल्या  सहकार खात्याची सूत्रे हाती घेणाऱ्या केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने  आगामी काळात कोणती नवी  समीकरणे उदयास येतात याकडे …

विरोधकांसमवेत राहुल गांधींची ‘ब्रेकफास्ट मीट’ तर पवारांची ‘साखरपेरणी’! Read More »

आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट!

नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना पुन्हा उधाण आले आहे.  विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर केंद्रीय सहकार मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चेला उधाण आले …

आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट! Read More »

समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा आता ‘अधांतरी’

पुणे प्रतिनिधी  पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३  गावांचा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने घाईगडबडीत स्थापन केलेल्या महानगर नियोजन समिती आता ‘अधांतरी’ठरली  आहे .उच्च न्यायालयाने या समितीला स्थगिती दिल्याने २३ गावांवरून आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा ‘कलगीतुरा’ रंगणार आहे. महानगर नियोजन समितीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पीएमआरडीएने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या ८०० गावांच्या …

समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा आता ‘अधांतरी’ Read More »