‘त्या’ साठी …राहुल गांधी सायकलवरून संसदेपर्यंत!
नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट दाखविण्यास प्रारंभ केला आहे. पेगासस हेरगिरी, महागाई आणि कृषी कायदे यासह विविध मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेल्या पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात सायकल मार्चमध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लब ते संसदेपर्यंत सहभागही घेतला. राहुल गांधींच्या बैठकीत डावे …