निलंबित १२ आमदारांची धाकधूक वाढली !
नवी दिल्ली| विधानसभेत पीठासन अधिकारी भास्कर जाधव यांच्यासमोर हुज्जत घालणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना मागील पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलं होत. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने आदेश राखून ठेवल्याने या १२ आमदारांची धाकधूक वाढली आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आणि त्यांना लेखी म्हणणे …