After being teased, yoga guru Ramdev Baba was seen getting angry. The people of Kashmir have been subjected to atrocities for a long time. The sabotage is vividly portrayed in The Kashmir Files. Commenting that this is the result of petty politics, Baba Ramdev was incensed when asked by a journalist about the rising prices of petrol and diesel and told reporters, "Now calm down, otherwise it will not get better."

Yoga Guru Ramdev Baba:रामदेव बाबा को गुस्सा क्यू आया!

करनाल ।योगगुरू बाबा रामदेव (Yoga Guru Ramdev Baba) बुधवारी हरियाणाच्या करनाल जिल्ह्यात  काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाबाबत राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला.यावेळी पत्रकारांनी   वाढती महागाई(rising inflation), पेट्रोल-डिझेल 40 रुपये लिटर आणि एलपीजी सिलिंडर 300 रुपयांना मिळणार असल्याच्या त्यांच्या जुन्या दाव्यांवर छेडल्यावर योगगुरू रामदेवबाबा भडकल्याचे पाहावयास मिळाले. 

  काश्मीरमधील लोकांवर दीर्घकाळापासून अत्याचार होत आहेत. द काश्मीर फाइल्स या चित्रपटात या तोडफोडीचे स्पष्टपणे चित्रण करण्यात आले आहे. क्षुल्लक राजकारणाचा हा परिणाम आहे ,असे भाष्य करत असताना    पेट्रोल आणि डिझेलच्या (rising prices of petrol and diesel) वाढत्या किमतींबाबत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बाबा रामदेव भडकले आणि त्यांनी पत्रकारांना ‘आता शांत व्हा, नाहीतर बरे होणार नाही’ असे म्हटले आहे.  
मोदी सरकार आल्यावर वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल 40 रुपये लिटर आणि एलपीजी सिलिंडर 300 रुपयांना मिळणार असल्याच्या त्यांच्या जुन्या दाव्यांवर बाबा रामदेव यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी आधी भन्नाट उत्तरे देऊन पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न केला. यात यश आले नाही तेव्हा बाबा रामदेव संतापले आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. इतकेच नाही तर रामदेव बाबा यांनी पत्रकाराला रागात म्हटले की, आता गप्प बस, नाहीतर बरं होणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *