निश्चय केल्यास…
जर तुम्ही बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केल्यास लोकसभेच्या जवळजवळ २०० जागा आहेत. पक्षाची लोकप्रियता शिगेला असतानाही भाजप या ठिकाणी ५० च्या आसपासच जागा जिंकू शकली. बाकी राहिलेल्या जागांपैकी भाजप कोणासाठी काहीच सोडत नसल्याचे सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना प्रशांत किशोर म्हणाले. यावरुन असे दिसून येते की काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस किंवा अन्य एखादा पक्ष अथवा या पक्षांचा एकमेकांमध्ये ताळमेळ बसून एक आघाडी तयार होणार असेल, तर त्यांनी एकत्रित येऊन आम्ही २०० पैकी १०० जागा जिंकणार असा निश्चय केल्यास विरोधी पक्षांना त्यांच्या लोकसभेमधील जागा २५०-२६० पर्यंत वाढवता येतील, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारे उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये १०० आणखीन जागा मिळवून भाजपला पराभूत करणे शक्य असल्याचा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. मुद्द्यांच्या जोरावर एक विजयगाथा सादर केली आहे. विरोधी पक्षांना भाजपला पराभूत करण्यासाठी किमान यामधील दोन मुद्द्यांवर आघाडी मिळावी लागेल. तसेच एक काथकथित ‘महागठबंधन’ तयार करण्याबरोबरच बरच काही करावे लागणार असल्याचेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
२०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे, पण त्यासाठी विरोधी पक्षांना खऱ्या अर्थाने एकत्र यावे लागेल, असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत. २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य पण त्यासाठी विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची गरज असल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. बिहारमध्ये २०१५ नंतर एकही ‘महागठबंधन’ यशस्वी झाले नाही. केवळ राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकत्र येऊन काही होत नाही. भाजपला हरवण्यासाठी तुम्हाला भावनात्मक आणि सुनियोजित पद्धतीने एकत्र येण्याची गरज असल्याचेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.