कर्नाटकमध्ये भाजप नेत्याचे वक्तव्य
बेंगळुरू|
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने केवळ लोकसभा निवडणुका जिंकू शकतो पण विधानसभा निवडणुका फक्त आपल्याला कामांच्या आधारे जिंकल्या जाऊ शकतात. असं वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री
बी.एस. येडियुरप्पा यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे केंद्रात खूप काम करीत आहेत. पुढील निवडणुकीनंतर ते पुन्हा पंतप्रधान होतील पण राज्यातील काँग्रेसला आता जाग आली आहे. विरोधी पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखत आहे. मग आपणही मेहनत घेण्याची गरज आहे. बूथ स्तरापासून पक्ष बांधणी करायला हवी, तरच आपण काँग्रेसला धडा शिकवू शकतो.
हानेगल आणि सिंदगी या मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकणे सोपे नाही, ती आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे.असा इशाराही येडियुरप्पा यांनीदिला आहे. बेंगळुरूमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कर्नाटकमध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली त्या बैठकीत हे चिंतन करण्यात आले.