मुंबई|केंद्रात ब्लॅकमेलिंग करणारे सरकार आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर कसा केला जात आहे हे संपूर्ण देश बघतोय. कर नाही त्याला डर कशाला अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मांडली.
भाजपच्या रडारवर काँग्रेसचे नेते आहेत या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. महाविकास आघाडी सरकारमधील केवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हेच पक्ष भाजपच्या निशाण्यावर आहेत. असं काहींना वाटतं; मात्र त्यात तथ्य नाही.
काँग्रेसच्या नेत्यांची नावे आमच्याकडे आहेत. येत्या दोन दिवसात ती उघड करू. असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. त्यावर पटोले यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली. पटोले म्हणाले, आमच्या कोणत्याही मंत्र्यांवर त्यांनी लावले तरी आम्ही त्यांच्या इशाऱ्याला घाबरत नाही. ईडी आणि सीबीआयचा वापर कसा केला जात आहे हे संपूर्ण देश बघतोय. कर नाही त्याला डर कशाला असे ते म्हणाले.