inc bjp Congress general secretary Priyanka Gandhi modi india rising petrol, diesel and gas cylinder prices

… या ‘ विकासा’ला आता ‘सुट्टी’ द्या, असे का म्हणाल्या प्रियंका गांधी! 

नवी दिल्ली| 
एकीकडे कोरोनामुळे लॉकडाऊन… जमापुंजी खर्च करून लोकं घरात बसली… लाखो लोकांनी  रोजगाराविना आहे तसे दिवस काढले…कोरोना काय त्याच्या आधीपासून महागाई दिवसेंदिवस वाढतच  आहे. आजतर अर्थव्यवस्था कोलमडलेली  आहे.निर्बंधात  जगायचं कसं या पेचात सर्वसामान्य जनता  अडकली  आहे.दुसरीकडे श्रीमंत अधिक गर्भ श्रीमंत होत आहे आणि  गरीब फक्त नावालाच जगत आहे. मग नक्की कुणासाठी अच्छे दिन होते ? हाच प्रश्न आता       काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी  यांच्या एका ट्विटमुळे ऐरणीवर आला आहे. 
 प्रियंका गांधी  यांच्या ट्विटमुळे वास्तव काय आहे, हे प्रकर्षाने समोर आले आहे. त्यांनी पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढीसह महागाईवरून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होत आहे.तर  दुसरीकडे सामान्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एलपीजी इंधन आणि पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ होत आहे. हाच भाजपचा विकास असून आता या विकासाला माघारी पाठवण्याची गरज आहे. असे प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपच्या सबका साथ, सबका विकास या धोरणाचा खरा अर्थ हा अत्यावश्यक गोष्टींच्या किंमतीत वाढ करण्याचा असल्याची टीकाही त्यांनी या ट्विटद्वारे केली आहे.केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना प्रियांका गांधी म्हणतात, ‘मोदीजी आपल्या राज्यात दोन प्रकारचाच विकास होत आहे. एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होत आहे.तर  दुसरीकडे सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या वस्तूंच्या महागाईमध्ये वाढ होत आहे. जर हाच विकास असेल तर या विकासालाच आता सुट्टी देण्याची गरज आहे. भाजप सरकारच्या काळात स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढत आहे. पेट्रोल – डिझेलच्या किंमती तीन – चार महिन्यात ६० ते ७० वेळा वाढल्या आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. वाढत्या महागाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केंद्रसरकारला धारेवर धरलं आहे. पेट्रोल – डिझेलच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या याकडेही त्यांनी यापूर्वीच लक्ष वेधले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *