politics maharashtra

 ‘दाऊद ‘कुणाचा :रत्नागिरीतील जागेवर योगा सेंटर कुणाचे?

मुंबई । राज्यात राजकीय बॉम्ब जोरात फुटत आहेत आणि एक एक नवी माहिती मात्र समोर येत आहे. समाजकारणाच्या नावाखाली राजकारणात सत्तेचा पट ताब्यात ठेवण्यापेक्षा तो पुन्हा हस्तगत करण्यासाठी कुठपर्यंत मजल मारली जाते हे यानिमित्ताने आता चव्हाट्यावर आले आहे. एकीकडे वाढत्या महागाईने जनता होरपळत असताना राजकीय आखाड्यात मात्र ‘दाऊद ‘कुणाचा?  यावरून ‘ कलगीतुरा’ रंगला आहे. त्यात आता दाऊदच्या  रत्नागिरीतील जागेवर योगा सेंटर कशाला ? हा  नवा मुद्दा गाजणार आहे मात्र त्यातून भाजप कशी सुटका करून घेते हा मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरणार आहे.
ड्रग्स प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नवाब मलिक विरुद्ध भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यात ‘ सामना’ रंगला आहे. मलिक यांनी ड्रग्स प्रकरणात फडणवीस यांच्या काळातच ड्रग्सच्या साम्राज्याचा विस्तार झाल्याचा थेट आरोप करताना नदी संवर्धनाच्या गाण्याचा फायनान्सर ड्रग्स प्रकरणाशी संबधीत असल्याचे बिंग फोडले. त्यानंतर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी मात्र मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचे सांगितले आणि मूळ  विषयाला बगल दिली. ड्रग्स प्रकरणावरुन सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.  अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे गंभीर आरोप एकमेकांवर केले जात आहेत. फडणवीस यांनी मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला. तर मलिक यांनी दाऊदची मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केल्याचे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले.  यावर आता  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.  ते म्हणाले, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाच्या आरोपाबाबत मलिक खुलासा करत आहेत. आता दाऊदचे नाव घेऊन संपलेल्या नावाला पुन्हा मोठे करणे योग्य नाही. दहशत  निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. दाऊदची रत्नागिरीतील जागा कोणी घेतली हे सगळ्यांना माहित आहे. तीच जागा का घेण्यात आली. तेथे योगा सेंटर उभारले जाणार असल्याचे समजते;पण गोळवलकर यांच्या जागेत ही योगा सेंटर झाले असते मात्र तेथे का केले नाही. दाऊदच्या जागेत स्मारक का, असा सवाल सामंत यांनी उपस्थित  केल्याने आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *