Who is Padalkar? He has been sworn in for four days. If you go, hit the slippers. Then Vijay Vadettiwar, the Minister of Mahavikas Aghadi, has reacted by saying what will we say about the trust of such people.

कोण पडळकर…सांगायचा भाजपमध्ये जाणार नाही,गेलो तर चपलांनी हाणा!

नागपूर |
कोण पडळकर,त्याला चार दिवस झाले शपथ घेऊन, सांगायचा भाजपमध्ये जाणार नाही. गेलो तर चपलांनी हाणा. मग अशा लोकांच्या विश्वासाहर्तेवर आपण काय बोलणार अशा शब्दात महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ओबीसींच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारने जेव्हा विनंती केली होती तेव्हा मात्र डेटा दिला नाही किंवा मदत केली नाही मात्र आता सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने वेळ मागण्यांसाठी दिलेले शपथपत्र आम्हाला दिले असते तर महाराष्ट्रातील 105 नगर पंचायतीच्या निवडणुकात ओबीसींचे नुकसान झाले नसते.ही  भूमिकाही त्यांनी मांडली.
आमदार पडळकर यांच्या टीकेला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्या  विश्वासार्हतेवरच  प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्दय्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवाय, वडेट्टीवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्ग आयोसाठी ४५० कोटींची घोषणा केली असल्याचाही आरोप केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *