नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लोकसभेत हजर राहण्यासाठी का वेळ मिळत नाही ? असा सवाल करतानाच त्यांना ओबीसी विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकांवरही विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही. अशा शब्दात तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी भूमिका मांडली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येणार्या कामकाज प्रक्रियेवरून ब्रायन यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री कुठे आहेत? त्यांना येण्यासाठी एक किंवा दोन मिनिटे वेळ मिळू शकत नाही का? आमचे म्हणणे ऐकण्यासाठी संसदेमध्ये हजर राहणार आहेत का? असे सवाल करत मनमोहन सिंग आणि एच.डी. देवीगौडा हे दोन माजी पंतप्रधान देखील सभागृहात उपस्थित होते.त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.याकडे लक्ष वेधून पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना संसदेसमोर जाण्याची इच्छा नव्हती.असा दावा त्यांनी केला.
लोकसभा आणि राज्यसभेत कोणत्या चर्चेविना 39 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. अशा पद्धतीने लोकशाही देशात चालू शकत नाही. विधेयक मंजूर होण्याचा सर्वसाधारण वेळा दहा मिनिटांचा आहे. त्यानंतर तुम्ही विरोधी पक्ष हे संसदेत अडथळा आणत असल्याचे म्हणत आहेत, ते कितपत योग्य आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
