Ajit Pawar had criticized Shiv Sena's Vijay Shivtare in such words that if anyone comes to our share, we have the threat of spoiling their fun. Now Vijay Shivtare also took a hard look at Ajit Pawar's statement saying 'Na ghar ka na ghat ka', Shivtare commented that Ajit Pawar will be the next Raj Thackeray.

Vijay Shivtare: जे शिवसेनेत घडले होते, तेच अजित पवार यांच्या बाबतीतही सुरु  

मुंबई। कोणी आमच्या वाट्याला आले तर त्यांची मस्ती उतरवण्याची धमक आमच्यात आहे,अशा शब्दात अजित पवार यांनी शिवसेनेच्या ( Shiv Sena) विजय शिवतारेंवर (Ajit Pawar had criticized Shiv Sena’s Vijay Shivtare) टीका केली होती. आता विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare)देखील अजित पवारांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार  घेताना  ‘ना घर का ना घाट का ‘असे म्हणत अजित पवारांचा पुढचा राज ठाकरे होणार,(Ajit Pawar will be the next Raj Thackeray)  अशी टिप्पणी शिवतारेंनी केली आहे.परिणामी शिवतारेंच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीच्या गोटातून कसे प्रत्युत्तर दिले जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

विजय शिवतारे म्हणाले, अजित पवार यांचे रोखठोक, परखड बोलणे असले तरी त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढला जात आहे. स्वतः त्यांच्या घरातून त्यांना विरोध आहे. जे शिवसेनेत घडले होते, तेच अजित पवार यांच्या बाबतीत होत आहे. ताकद चांगली असतानाही राज ठाकरेंना डावलून महाबळेश्वरच्या सभेत उद्धव ठाकरे यांना वारस करण्यात आले होते.

 अजित पवारांना पक्षाबाहेर ढकलण्याचे काम सुरु आहे. शरद पवार म्हणाले होते, माझ्या पक्षातून कोणी जात असेल तर जाऊ दे. दुसऱ्या दिवशी सामनात रोखठोक सदरात याबाबत छापून आले. बदनाम करुन अजित पवारांना पक्षातून ढकलण्यात येत आहे. ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होईल.असे शिवतारे यांनी म्हटले आहे.  अजित पवारांची पक्षात अडचण होत आहे. शरद पवारांना मुलीच्या हातात पक्ष द्यायचा आहे, त्यासाठी ही डिप्लोमसी सुरु आहे. तसेच अजित पवार यांनी माज उतरवण्याची भाषा करू नये. स्वतःच्या मुलाला का निवडून आणू शकले नाहीत? असा सवाल विजय शिवतारे यांनी यावेळी केला.

अजित पवारांचे  ‘हे’ वक्तव्य…  

अजित पवार आपल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, विजय शिवतारे हे माझी बहीण सुप्रिया सुळे आणि आमचे दैवत शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत होते. पवारसाहेबांची उंची आणि सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील काम पाहून त्यांच्यावर टीका होणे, मला योग्य वाटत नाही. त्यामुळे कुणाला मस्ती आली तर ती जिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, असा इशारा अजित पवार यांनी  दिला.

web title:Vijay Shivtare: What happened in Shiv Sena, the same is happening with Ajit Pawar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *