'Victory in four states detrimental to BJP'

Mamata Banerjee :’चार राज्यातील विजय भाजपला नुकसानदायक’

कोलकाता।  

सध्या आक्रमक होऊ नका, सकारात्मक व्हा. चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील विजय हा भविष्यात भाजपसाठी मोठे नुकसानदायक ठरणार आहे.२०२२ निवडणूक निकाल २०२४ निवडणुकांचे भवितव्य ठरवतील, असे  भाकीत असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी  यांनी केले आहे.

गोवा, पंजाब, मनिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणूक निकाल हाती आल्यानंतर त्यांनी हे मोठे विधान केले आहे.त्यांनी म्हटले आहे की,काँग्रेसची इच्छा असेल तर आपण सर्वजण मिळून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लढू शकतो. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी निराश होऊ नये आणि त्याच ईव्हीएम मशीनच्या ( EVM machine) फॉरेन्सिक चाचण्या घ्याव्यात. यावेळी अखिलेश यादव यांच्या मतांची टक्केवारी२० % वरून ३७% पर्यंत वाढली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

भाजप सत्ता स्थापन करेल

 गोवा, पंजाब, मणिपूर , उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल 10 मार्चला लागले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपला सर्वाधिक मते मिळाली आहेत. या चारही राज्यात भाजप सत्ता स्थापन करेल, अशी चिन्हे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *