नवी दिल्ली । अल्पमुदतीच्या कंत्राटी तत्त्वावर सशस्त्र दलात तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेतील विविध तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi )यांनी तरुणांमध्ये आणखी असंतोष वाढेल असा इशारा भाजपला (BJP)दिला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांना लिहिलेल्या पत्रात गांधींनी मागणी केली आहे की, सरकारने या योजनेशी संबंधित धोरणात्मक तथ्यानुसा आपली भूमिका स्पष्ट करावी. या योजनेतील तरतुदींबाबत देशभरातील तरुणांनी त्यांच्याशी अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या आहेत.
या योजनेतंर्गत लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांसाठी नवीन भरती होणार आहे. चार वर्षांनंतर ७५ टक्के सैनिक पेन्शनसारख्या सुविधांशिवाय निवृत्त होतील. उर्वरित २५ टक्के भारतीय लष्करात नियमित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी भरती होणाऱ्या तरुणांपैकी ७५ टक्के तरुणांना चार वर्षांनंतर पुन्हा नोकरी दिली जाईल, त्यामुळे त्यांची संख्या दरवर्षी वाढेल. यामुळे देशातील तरुणांमध्ये अधिक असंतोष निर्माण होईल.
काय म्हटले आहे वरुण गांधी यांनी…
केवळ चार वर्षांच्या कालावधीनंतर निवृत्त झालेल्या सैनिकांचे काय होणार, या मुख्य प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जेव्हा लष्करात १५ वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवृत्त झालेल्या सैनिकांना भरती होण्यात फारसा रस दाखवला नाही. चार वर्षांच्या सेवेत या तरुणांचे शिक्षण खंडित होईल, त्याचप्रमाणे त्यांना इतर समवयस्कांच्या तुलनेत त्यांचे वय कमी असल्याने त्यांना शिक्षण घेणे आणि इतर संस्थांमध्ये नोकरी मिळण्यात अडचणी येणार आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे. (Varun Gandhi warns BJP: Dissatisfaction will increase among youth) तसेच या योजनेमुळे प्रशिक्षणाचा खर्चही वाया जाईल, कारण चार वर्षानंतर या प्रशिक्षित जवानांपैकी केवळ २५ टक्केच लष्कराला वापरता येणार आहे. बेरोजगार तरुणांचे हित सर्वोपरी ठेवून सरकारने या योजनेशी संबंधित धोरणात्मक तथ्ये लवकरात लवकर समोर आणून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन गांधी यांनी राजनाथ सिंह यांना केले आहे.