मुंबई । २०१४ साली मोदींनी जशी ‘चाय पे चर्चा’ केली होती, तशी चर्चा आता तुम्ही चहा पिताना, केस कापताना सलूनमध्ये, सावली बार सोडून कुठेही बसलात तरी भ्रष्टाचार पे चर्चा करा. महाराष्ट्रात भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या. असे आवाहन शिवसैनिकांना करताना जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत, तोपर्यंत आपले आंदोलन थांबणार नाही. मला देवेंद्र फडणवीस यांची किव येते. तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, वरती तुमचे बापजादे बसलेत. तरी सुद्धा भ्रष्टाचाऱ्यांची हकालपट्टी करण्याची तुमची हिंमत होत नाही? असा रोखठोक सवालही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत महायुती सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.त्यावेळी केंद्रसरकारसह महाराष्ट्रातील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहेत. या भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय… (खाली मुंडे वर पाय) असे तुम्ही म्हणालात. पण डोके असेल तर ना… कारण, हे बिनडोक्याचे लोक आहेत. त्यांना केवळ पायच आहेत. सुरतेला व गुवाहाटीला पळून जायला. यांच्याकडे डोके नाहीत केवळ खोके आहेत. त्यामुळे ते खोके घेऊन बसलेत.अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात व प्रत्येक शहरात या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.हे आंदोलन आता सुरु झाले आहे असेही ते म्हणाले.
… तर भ्रष्टाचाराच्या रांगेत महाराष्ट्र पहिला
दिल्लीत महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगाकडे जाताना पोलिसांनी त्यांचा मार्ग रोखला. आपण भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. ही जी काही जुलूमशाही सुरू आहे, त्याच्याविरोधात जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल. ती उतरलेलीच आहे. ती वाट पाहत आहे की नेतृत्व कोण करतंय? लाज एका गोष्टीची वाटते, आपण दरवेळी सांगतो की, हा शाहू- फुले – आंबेडकरांचा व साधूसंतांचा महाराष्ट्र आहे. हे राज्य नेहमी देशाला दिशा दाखवते. पण या भ्रष्ट महायुतीने तो कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे? भ्रष्टाचारात नंबर एक, जर भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत येईल, पण विकास व नितीमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत दिसेल. आम्हाला या लोकांची खरोखर लाज वाटत आहे,असा घणाघात ठाकरे यांनी केला.
चीफ मिनिस्टर नव्हे तर थीफ मिनिस्टर
देवेंद्र फडणवीस भ्रष्ट लोकांना पाठिशी घालत आहे. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र त्यांना अध्यक्ष करण्यासाठी माणूस मिळत नाही. तसेच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून त्यांच्याजागी दुसरे घेण्यासाठी कुणी सापडत नाही का? कुणाचा दबाव आहे तुमच्यावर? फडणवीसांनी आपल्याला हा भ्रष्टाचार पटत असल्याचे जाहीर करावे किंवा भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी, असे ठाकरे म्हणाले. फडणवीसांना इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर नव्हे तर थीफ मिनिस्टर आहेत. काँग्रेसने त्यांना ही उपमा दिली आहे. चांगला शब्द दिला आहे. त्यामुळे फडणवीसांमध्ये थोडाही स्वाभिमान असेल तर त्यांनी दबाव झुगारून या मंत्र्यांची हकालपट्टी करावी. कारण, इथला दबाव वाढला तर मग तुम्हाला पळता भुई थोडी होईल.

सत्तेचे ४८ नियम – यशस्वी लोकांचा गुपित मार्ग!
राजकारण, व्यापार, आणि समाजात सत्तेच्या खेळात
जिंकण्यासाठी ४८ अचूक नियम!
तुमचं नेतृत्व अधिक प्रभावी व्हावं, निर्णय अधिक वजनदार असावेत आणि प्रत्येक कृतीत आत्मविश्वास असावा असं वाटतंय का?
हे पुस्तक तुम्हाला शिकवेल:सत्ता मिळवण्याची मनोविज्ञानावर आधारित रणनीती,प्रभावी नेतृत्वाचे नियम,शत्रूला नमवण्याचे चाणाक्ष मार्ग,जुनी सत्ता राखत नवीन सत्ता निर्माण करण्याची सूत्रं
“सत्तेचे ४८ नियम” वाचून तुमचं आयुष्य बदलू शकतं!
पुस्तक खरेदीसाठी whatsapp करा आणि घरपोच मिळवा 7030783858