Uddhav Thackeray's Comment from Editorial: 'Hanuman Bhakta' declared the truth of fifty boxes, what if it is not his approval of 'Sri Rama'?

Uddhav Thackeray’s Comment from Editorial:’हनुमान भक्ता’ने  पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या ‘श्रीरामा’ची मान्यता असल्याशिवाय?

मुंबई| ‘आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नातं जुळवायचं म्हटलं तरी लोक मागे हटतील. काळानं सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार?’असे भाष्य उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या संपादकीयमधून (Uddhav Thackeray’s Comment from Editorial) करण्यात आला आहे.  तसेच रवी राणा आणि बच्चू कडू वादामागे कोण? यावर सल्लाही दिला आहे. 

अमरावतील जिल्ह्यातील  बच्चू कडू आणि रवी राणा  (MLAs of Amravati district, Bachchu Kadu and Ravi Rana)या दोन आमदारांमध्ये उफाळलेला वाद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीनंतर मिटल्याचे बोलले जात असले तरी   अवघ्या दोन दिवसांत पुन्हा दोघांमध्ये बिनसले आहे. आता या वादावर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाष्य केले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात समेट घडवून आणला. पण, एक दिवस लोटत नाही, तोच दोघांमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे. यापार्श्वभूमीवर सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे कि, ‘बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे. कडू म्हणतात, कालपर्यंत आपली ओळख शेतकरी-कष्टकऱ्यांचा कैवारी, दिव्यांगांना मदत करणारा आमदार अशी होती, पण आता एखाद्या लग्नात गेलो तरी ‘आला आला, खोकेवाला आला’ असे हिणवले जाते. हे आता सहन करता येणार नाही’, असे म्हटले आहे.

‘रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. संकट आले व सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालिसा वाचतात व बेभानपणे आरोपांची गदा फिरवितात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल’, असे  नमूद करत  ‘सामना’तून बच्चू कडूंना राणांच्या पाठिशी कोण आहेत, याचा शोध घेण्याचा सल्ला  देण्यात आला आहे. (Uddhav Thackeray’s Comment from Editorial: ‘Hanuman Bhakta’ declared the truth of fifty boxes, what if it is not his approval of ‘Sri Rama’?)

बच्चू कडू यांची पाठराखण

‘कडू यांनी अपंगांसाठी आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले, पण एकदा गुवाहटीला गेल्याने त्या कामावर बदनामीचे ‘खोके’ पडले’, असं भाष्य सामनातून करण्यात  आल्याने  बच्चू कडू यांची पाठराखण सामनातून करण्यात आली  आहे का? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरला असून सत्ताधारी आता कोणते प्रत्युत्तर देते, यापेक्षा त्यांची भूमिका काय ?याकडे लक्ष लागले आहे. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *