Uddhav Thackeray: State government impotent, Fadnavis Fadtoos Home Minister! Roshni Shinde inhuman beating case

Uddhav Thackeray: राज्य सरकार नपुंसक,फडणवीस फडतूस गृहमंत्री!

मुंबई। मागच्या  आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नपुंसक म्हटले होते. त्याची प्रचिती काल ठाण्यात आली, अशी घणाघाती टीका करताना महाराष्ट्राला अतिशय फडतूस गृहमंत्री (Home Minister) लाभले आहेत अशा शब्दात  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेन्द्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. 

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल ठाणे शहरात अमानुष मारहाण (Roshni Shinde Inhuman Beating Case) करण्यात आली. त्यावरुन   पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Home Minister Devendra Fadnavis and Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 

 महाराष्ट्राला अतिशय फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. लाचार, लाळघोटे करणारे, नुसते फडणवीसी करणारा माणुस गृहमंत्रीपद मिरवतोय.अशा शब्दात टीका करताना उद्धव ठाकरे यांनी  त्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.असेही सुनावले आहे. 

सरकारच नपुंसक म्हटल्यावर कोणाकडून अपेक्षा ठेवायचे. जिवाला जीव लावणारे, महिलांचे संरक्षण करणारे, आनंद दिघेंचे ठाणे, अशी ठाण्याची सुसंस्कृत ओळख होती. मात्र, आता गुंडांचे ठाणे, अशी ठाण्याची ओळख होत आहे. ठाण्यात महिलांचीही गँग तयार केली जाते का? महिला कार्यकर्त्यांवर महिलांकडूनच अशी अमानुष मारहाण यापूर्वी महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती.असेही ठाकरे म्हणाले.  एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री? असा प्रश्न आता पडला आहे.असे नमूद करताना ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे आता गुंडांचे मंत्री झाले आहेत.

मनात आणलं  तर आता या क्षणाला ठाणेच काय अवघ्या महाराष्ट्रातून या गुंडांची गुंडगिरी आम्ही उखडून फेकून देऊ शकतो. असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्य सरकार नपुंसक असेल. मात्र, शिवसैनिक हा नपुंसक नाही. बाळासाहेबांच्या नावाने या गुंडांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. मात्र, महिलांवर हल्ला करणारे हे नपुंसक आहेत. 

याप्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी आयुक्तालयात गेलो तर तेथे आयुक्तच उपस्थित नाही.  असे बिनकामाचे आयुक्त काय कामाचे? यापूर्वी ठाण्यातच एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात हे असे शोभते का? पोलिस दबावाखाली आहेत का? गृहमंत्र्यांना थोडी जरी लाज, लज्जा, शरम असेल तर त्यांनी ताबडतोब अशा बिनकामाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे.असेही ठाकरे म्हणाले.

आता जेल यात्रा करावीच   लागणार

उद्धव ठाकरे म्हणाले, हे गुंड लोक सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा करत आहेत. मात्र, त्यांना आता जेलयात्रा करावीच लागणार आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांना सरकारने तातडीने अटक करावी किंवा सत्तेतून बाहेर पडावे.असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *