Uddhav Thackeray: If we face each other, then we will give our opinion!

Uddhav Thackeray: सामना समोर होईल, तेंव्हा दाखवून देईल!

नागपूर । ज्यांना स्वतः कमावण्याची हिंंमत नाही, लायकी नाही ते सर्व चोरतात. स्वतःच्या हिमतीवर लढता येत नाही. ते शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आले आणि जाताना गेले ;पण वडिल, धनुष्यबाण, पक्ष चोरत आहेत. हिमंत मात्र तुम्ही चोरू शकत नाहीत. मी दाखवून देईल की, बाळासाहेबांची शिवसेना कोणती. तुम्ही काय केले हे आता नाही कळणार. मात्र  सामना समोर होईल, तेव्हा दाखवून देईल  असा थेट इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना  नागपुरात आज एका सभेत दिला.  

 उद्धव ठाकरे म्हणाले, कुणी कोणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात लोकशाही टिकवायची असेल तर रणशिंग फुंकण्याची गरज आहे.  हे आधीही मी बोललो. गुप्त मतदान असताना आता आपलेच मतदान आपल्यातूनच गुप्त होत आहे. ते सुरत पुढे गुवाहाटी, दिल्लीत जात आहे.  धमक अंगात असावी लागते. मी दाखवून देईल की, बाळासाहेबांची शिवसेना कोणती. तुम्ही (एकनाथ शिंदेंनी) काय केले.  हे आता नाही कळणार.  सामना समोर होईल, तेव्हा दाखवून देईल.

मी नागपुरात गेल्या आठवड्यात आलो होतो. मी पोस्टर बघत होतो. आपले कोणते आणि तोतये कोणते.असे स्पष्ट करताना ठाकरे म्हणले,  फोटो लावले ते मीच काढलेले होते, तेच ‘ते ‘लावत आहेत. त्यांना फोटो काढण्याची अक्कल नाही आणि  राजकारण करायला निघाले.

भाजप शिंदे गटाला टाचणी लावत नाही ना? कारण चार मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराची प्रकरणे निघाली.  ते शिंदे गटाचेच आहेत. महाराष्ट्रात मध्यावधी येणार हे मला वाटते. जे तोतये, गद्दार गेले, त्यांनी छातीठोकपणे सांगावे की, आम्ही भाजपच्या उमेदवारींवर लढणार नाही.

  नाव चोरायचे, वडील चोरायचे हे झाले; पण चार -पाच महिन्यात त्यांनी घोटाळे केले.  हे प्रकरण बाॅम्बरुपाने बाहेर येत आहेत. किती घोटाळ्यावर बोलायचे, त्याचीही नैतिकता असते. आमच्या एका मंत्र्यांवर आरोप झाले होते.  त्याला लाथ मारून काढले. आता तो गद्दारही निघाला. हे सर्व घोटाळेबाज घोटाळे वाचवण्यासाठी तिकडे गेले आहेत का?याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

… चंपा मालिश नाही बरं  

उद्धव ठाकरे म्हणाले, हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्याचे कारण सांगत आहेत की, आता शांत झोप लागते. भाजपची चंपी मालिश आहे पण चंपा मालिश म्हटलो नाही बरं यावर हास्याचे कारंजे उडाले. ते म्हणाले, ज्यांच्यावर आरोप केले, तेच भाजपने घेतले.  आता ते आमच्याकडे का बोट दाखवित आहेत.असा सवालही ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray: If we face each other, then we will give our opinion!)

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *