बुलढाणा ।मराठी मातीमधली गद्दारी गाडायची असेल, तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे निघाले पाहिजे. आज शहीद दिन, संविधान दिन आहे. नेमके काय बोलायचे हा प्रश्न आहे. शुभेच्छा द्यायचे म्हटले, तरी संविधान आज सुरक्षित आहे का?(is the constitution safe today?) चार पाच दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर होतो. त्यांनी प्रश्न विचारला होता, आपल्याला हुकूमशाही (dictatorship) हवी की लोकशाही (democracy)हा महत्त्वाचा प्रश्न आहे.असे प्रतिपादन उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी केले.
ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथे आज सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP)आयात पक्ष म्हणून जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रखर शब्दांत टीकाही केली. ठाकरे म्हणाले, भाजप आयात पक्ष आहे. त्यांचे विचार, नेते संपले आहेत. पक्ष भाकड झाला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी यादी काढा. स्वतः चंद्रकांत पाटील बोलले आहेत. आम्ही मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आहे. हा आयात पक्ष. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. नेते चोरून घ्यायचे. 40 गद्दार, रेड्यांना प्रश्न विचारतो. त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी सांगावे, भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाही. नाव बाळासाहेबांचे पाहिजे, आशीर्वाद मोदींचा पाहिजे.असेही ठाकरे म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितला आहे. तुम्ही पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थही पळवणार का, असा खडा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला केला.ते म्हणाले, आपल्या छत्रपतींचा अपमान करायचा. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये वळवले. कारण गुजरातच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. कालसुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबलले. त्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितला. भीती याची वाटते. जसे उद्योग गुजरातला नेले, तसे महाराष्ट्राचे तुकडे करायला हे मागे पुढे पाहणार नाहीत. का? कर्नाटकच्या निवडणुका. आपले मिंदे मुख्यमंत्री शेपूट घालून बसतील. (Uddhav Thackeray: Democracy of dictatorship!)
इकडचे उद्योगधंदे तिकडे न्यायचे. त्यामुळे महाराष्ट्र कंगाल होईल, बेकारी वाढेल. आपली गावे तोडून महाराष्ट्र त्यांच्या घशात घालायचाय. सोलापूर तिकडे गेल्यानंतर पंढरपूरचा विठोबा तिकडे जाणार. हा पंढरपूरचा विठोबा तिकडे गेला, तर शतकानुशतके चालत आलेली परंपरा. ती काय कर्नाटकात टोल भरून जाणार. तुम्ही अक्कलकोटचे स्वामी समर्थ पळवणार का, असा सवालही ठाकरे यांनी केला.
ठाकरे पुढे म्हणाले की, काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेलेत. हे त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतीर्थावर शपथ घेतली. त्यानंतर कुलदैवत एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर अयोध्येला गेलो. हे आज नवस फेडायला गेले. गेल्या आठवड्यात हात दाखवायला. ज्याला स्वतःचे भविष्य माहिती नाही. तुमचे भविष्य ठरवणारे मायबाप दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटले की उठता, बस म्हटले की बसता.अशा शब्दात ठाकरे यांनी टीका केली.
मी बुलढाण्यात आल्यानंतर काही जुने चेहरे दिसत नाहीत. ते फसवे होते. गद्दार निघाले. त्यांना वाटले बुलढाणा माझी मालमत्ता. मात्र, हे मर्द मावळे, या धगधगत्या पेटत्या मशाली आहेत. अन्याय जाळायला निघालेल्या. आमचे सरकार पाडले. पाडायची पद्धत कशी? नितीन देशमुख येऊन भेटले. त्यांना घेऊन गेले होते, पण त्यांनी सांगितले, तुम्ही कापला तरी सोबत येणार नाही.
ताईंनी पंतप्रधानांना राखी बांधली
मी पुन्हा नव्या दमाने उभा राहिलोय. पुन्हा जिंकणारच. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात. काही जणांना ते घेऊन गेले. आपल्या ताई होत्या. आपण कितीदा खासदार केले माहितय. या ताईंना धमक्या देण्यात आल्या. मुंबईतले दलाल पाठवले जायचे. त्यांच्या आजोबांच्या चेल्या चपाट्यांना अटक झाली. ताई मोठ्या हुशार. त्यांनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. तो फोटो छापून आणला. त्यानंतर ईडी, सीबीआयची हिंमत आहे का? ही चालूगिरी लोक बघत नाहीत?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
तर लाथ घालून हाकलून दिला असता…
उद्धव ठाकरे म्हणाले की, अब्दुल गटार. त्याने सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो, तर लाथ घालून हाकलून दिला असता. जसा एकाला दिला होता. अरे तरी सुद्धा गुळमुळ गुळमुळ. वाघ आहात का गांडूळ आहात. महाराष्ट्र तोडण्याची भाषा, महिलेचा अपमान, उद्योग जातायत. तरीही शेपट्या घालून बसताय. ही कसली बाळासाहेबांची शिवेसना. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही. शेतकरी टाहो फोडतोय. त्यांना विम्याचा पैसा मिळत नाहीय. या चिखलीमधले कोलारा नावाचे गाव आहे. गजानन साळुंकेने पाच एकरमध्ये सोयाबीन लावले. त्याला पाच-सात हजार खर्च आला. मिळाले किती फक्त ३३ रुपये.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.