मुंबई । मी काय सांगायचं.. म्हणजे माझ्याकडून काय अपेक्षित आहे. की, मी असं बोललं पाहिजे की.. हा बरं केलं.. चांगलं झालं.. बरोबर झालं… करायलाच पाहिजे.. अजून दगडं मारायला पाहिजे. हा फार छोटा विचार झाला.”कर्म असतं ना.. कर्म.. जे आपण या जन्मी करतो ना.. प्रत्येक जण.. मला लागू होतं तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं. त्यातून सूट कोणाला नाही. जे आपण या जन्मी करतो ते याच जन्मी आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार..’ अशी तिखट प्रतिक्रिया एकेकाळी राष्ट्रवादीत असणारे आणि सध्या भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (SHARAD PAWAR) यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST workers suddenly attacked) 8 एप्रिल रोजी अचानक दगडफेक आणि चप्पलफेक करत हल्ला चढवला. महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रकार धक्कादायकच मानला जात असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राजकारणात एखाद्या राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही. मग ते कोणत्याही पक्षाची असू दे. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून गेले यावेळी पोलीस काय करत होते अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.तर दुसरीकडे भाजपचे नेते मात्र वेगळे व्यक्त होत आहेत.
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत जेव्हा पत्रकारांनी भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले तेव्हा त्यांनी (BJP MP Udayan Raje Bhosale about the attack on Sharad Pawar’s house, he said, “We have to pay back whatever we do.”) ‘जे कर्म आपण करतो तेच याच जन्मी फेडावे लागतात.’ अशा तिखट शब्दात उदयनराजे यांनी शरद पवारांबाबत प्रतिक्रिया दिली.परिणामी आता राष्ट्रवादीच्या गोटातून कसे प्रत्युत्तर दिले जाते,याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.