पिंपरी।अजितदादांनी भाषण काय केले, यापेक्षा आठ दिवसातील गंमती -जमती सांगतो. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सांगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम आहेत. काम करत नाहीत, त्यांनी मणिपूरला जावे. आणि अजितदादांनी सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधीनंतर कर्तव्यदक्ष, कर्तबगार पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi) या नेत्यांच्या विधानामुळे वज्रमूठ किती मजबुत आहे हे दिसते यावर उद्योगमंत्री उदय सामंत (Udaya Samant) बोट ठेवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
त्यांनी महाविकास आघाडीच्या एकीवरच भाष्य केले. शिवाय मंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते असे यावर बोलताना सामंत म्हणाले, आमच्या पक्षाचे आमंत्रण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनावर आहे. कोणी पक्षात यायचे, कोणाला घ्यायचे हे ते ठरविणार आहेत, कारण ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे यांची पुढील रणनीती काय असेल यावर यानिमित्ताने तर्क वितर्क सुरु झाले आहेत.(Udaya Samant: How strong is the thunderbolt of Mahavikas Aghadi?)