ट्विटरच्या भूमिकेवरच संशय !

मुंबई
काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची अकाउंट ब्लॉक केल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे अकाऊंट बंद करण्याची कारवाई ट्विटरकडून करण्यात आली  आहे.  त्यामुळे ट्विटर इंडियाने त्यांची  ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे, हे जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
बलात्कार पीडित मुलीच्या पालकांचे फोटो ट्विटरवरून शेअर केल्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या  इतर नेत्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत  ट्विटरने आपली ब्लॉक पॉलिसी जाहीर करावी ,अशी मागणी केली.    गेल्या काही दिवसात ट्विटर व केंद्र सरकारमध्ये वाद उफाळून आला होता.  त्यानंतरच विरोधी पक्षांच्या नेत्यांची ट्विटर  हॅण्डल ब्लॉक होत आहे आणि हे दबावाखाली होत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *