मुंबई
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना ईडी,
एनआयए आणि सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे समाजमाध्यमावरून ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
गेली कित्येक वर्षे मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गटप्रमुख ते उद्धव ठाकरे यांचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकर यांचा राजकीय प्रवास आहे. शिवसेनेच्या अनेक राजकीय महत्त्वाच्या निर्णयात नार्वेकर यांचा सहभाग राहिलेला आहे. अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली असली तरी यामागे राजकीय षडयंत्र आहे का ? याचा तपास आता होणार आहे.
