मुंबई
राज्यातील विधान परिषदेच्या 12 जागा नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविल्यानंतर तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणाऱ्या राज्यपालांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकेची तोफ डागली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी करत नाही. त्यांच्यावर दबाव आहे. तो दबाव कुठून असू शकतो, हे आपल्याला माहिती आहे. घटनेनुसार राज्यांच्या अधिकारावर, कॅबिनेटच्या अधिकारावर जर ते अतिक्रमण करत असतील तर हा संघराज्याच्या अधिकारांवर हल्ला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजकारणातील प्यादं बनू नये. असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना दिला आहे.
१२ आमदारांबाबत त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय आहे. जसे अमित शहा यांनी 370 कलम हटवलं आणि खूप मोठा इतिहास केला. तसेच काही महाराष्ट्रमध्ये देखील जे 12 आमदारांवर जी राजकीय बंदी घातलेली आहे ती राज्यपालांनी उठवावी असेही राऊत यावेळी म्हणाले.