मुंबई:
बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नेमकी काय करावे? त्यांच्या राजभवनात जमून टाळ्या ,थाळ्या, घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष याप्रश्नी वेधून घ्यायचे की आणखी काही करायचे? असा खणखणीत सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या भूमिकेवरून निशाणा साधण्यात आला आहे.अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सर्वत्र चेष्टेचा विषय झाला आहे.पदाची इतके अवमूल्यन व घसरगुंडी राज्यपाल साहेबांनी करून ठेवले आहे.राजकीय कारणांसाठीच बारा नामनियुक्त आमदारांच्या नेमणुका रखडून ठेवल्या आहेत. हे राजभवनातील शेंबडे पोरही सांगेल. हायकोर्टानेही सौम्य भाषेत निर्णयासाठी आठ महिने घेणे जरा जास्तच झाले.निर्णय घेणे राज्यपालांवर बंधनकारक आहे, हेही अप्रत्यक्ष अधोरेखित केले आहे; मग न्यायालयाने कान टोचल्यानंतरही राज्यपालांनी सरकारकडून आग्रह धरला जात नसल्याचे वक्तव्य केले.त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांची वय झाले असल्याचा टोला लगावला होता.या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही आता राज्य सरकारने १२ नावांची शिफारस करून आता आठवा महिना लागला.मात्र राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे,हे राजभवनातील सुईणीने एकदा स्पष्ट करावे.असा उपरोधिक निशाणा राज्यपालांवर साधला आहे.पुण्यातील कार्यक्रमात काँग्रेसच्या जुन्याजाणत्या नेत्याने ‘ते तेवढं १२ आमदारांच्या नियुक्त्या कधी करताय, तेवढं बोला!’यावर राज्यपालांनी थंडपणे सांगितले, १२ आमदार निवडीचा राज्यसरकार आग्रह धरत नसताना तुम्ही का आग्रह धरता? असे उत्तर देणाऱ्या राज्यपालांनी पुन्हा एकदा स्वतःचा पाय स्वतःच्या धोतरात गुंतवून घेतला मात्र आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नेमकी काय करावे? त्यांच्या राजभवनात जमून टाळ्या ,थाळ्या, घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष याप्रश्नी वेधून घ्यायचे की आणखी काही करायचे? असा खणखणीत सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेने केला आहे.राज्यपालांनी घटनेची चौकट मोडली तर त्यांची इज्जत राहणार नाही व त्यांच्या इज्जतीशी सध्या त्यांचेच लोक खेळ करीत आहेत. 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवून भाजप व राज्यपाल स्वतःचेच हसे करून घेत आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे व वैफल्याचे झटके आहेत. जनतेच्या मनातून त्यांचे स्थान घसरले असल्याचे सांगत शिवसेनेने 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावरून राज्यपालांना चांगलेच निशाण्यावर धरले आहे.