केंद्रसरकारकडून लोकशाहीचा खून

विरोधी पक्षनेत्यांचा विजय चौकापर्यंत ‘मार्च’

inc Opposition leaders march to Vijay Chowk  Aggressive consecrated from the Pegasus espionage case    Opposition parties took an aggressive stance. Protest marched from Parliament to Vijay Chowk. There was a strong demand for repeal of three agricultural laws.
नवी दिल्ली
पेगासस हेरगिरी प्रकरणावरून  आक्रमक पवित्रा घेऊन विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारची कोंडी करण्यात आली परिणामी संसदेचे कामकाज संपूर्ण अधिवेशन काळात केवळ एकवीस तासच चालले.  दोन्ही सभागृहांचे काम स्थगित करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला.  संसदेपासून विजय चौकापर्यंत निषेध करत मार्च काढला.  तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.  विशेष म्हणजे या मार्चमध्ये विविध विरोधी पक्षांचे नेते आणि खासदार आणि सहभाग घेतला.
यावेळी  माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, आम्हाला संसदेमध्ये बोलण्याची परवानगी दिली नाही.  त्यामुळे आम्ही तुम्हाला बोलण्यासाठी आलो. हा लोकशाहीचा खून आहे असे ते म्हणाले.
दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले होते तर ते 13 ऑगस्ट रोजी संपणार होते मात्र बुधवारी सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज मुदती आधीच अनिश्चित काळासाठी तहकूब केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *