अकोला|राजकारण करायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती. ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे.अशा शब्दात( Prakash Ambedkar’s criticism of Fadnavis)वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तोफ डागली आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर अकोल्यात बोलत होते. विधिमंडळात फडणवीसांनी सादर केलेली ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती, असेही ते म्हणाले. फडणवीसांना मी मैदानी खेळाडू व दिलेर समजत होतो;पण त्यांची दिलेरपणा आणि खेळाडूवृत्ती दिसली नाही. त्यांनी ‘ती’ क्लिप सभापतींना सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत खालच्या दर्जाचे राजकारण म्हणतात. राजकारण करायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती. ही सामान्य माणसाची (common man)प्रतिक्रिया आहे.
‘ती’ क्लिप फडणवीसांनी लोकांपुढे आणली असती, तर पोलिसांनी नोटीस देखील दिली नसती, याकडेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधले.