खंडणीखोरांचा सरदार कोण?, भूतकाळ आठवा: चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई । देवेंद्र फडणवीस हे ‘चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर’ ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका भाजपच्या जिव्हारी (ठाकरेंची टीका भाजपच्या जिव्हारी ) लागली आहे. या प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार करताना उद्धव ठाकरे यांनाच खंडणीखोरांचा सरदार कोण आहे?(ठाकरेंची टीका भाजपच्या जिव्हारी ) हे जनतेला माहिती असल्याने आपला भूतकाळ आठवा अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे विसरलेली नाही. त्यामुळे फडणवीसांवर टीका करताना(ठाकरेंची टीका भाजपच्या जिव्हारी ) आपला भूतकाळ आठवावा. फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतःला आरशात पहावे असा टोलाही लगावला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून महायुती सरकारवर घणाघात केला होता. तसेच कथित मतचोरीचा दाखला देत देवेंद्र फडणवीस हे चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर असल्याचाही आरोप केला होता. त्यांची ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. राज्याचे महसूल मंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार केला. तसेच फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतःला आरशात पहावे असा टोलाही हाणला. खंडणीखोरांचा सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चीफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘थीफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. असेही ते म्हणाले.
शेवटच्या रांगेतील किंमत…
इंडीया आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्राने बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभे राहावे लागेल म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत आणि इथे चार टाळके घेऊन आंदोलन केले. तिकडे राहुल गांधींचे आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला.असा टोला लागवताना बावनकुळे यांनी ”उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता.” असा आरोप केला.
स्वतःला आरशात पाहायला हवे
देवेंद्र फडणवीस यांचे काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचे नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे आहे. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्र यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. याऊलट तुम्हाला लोकं कंटाळले आहेत,देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवे. असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत महायुती सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.त्यावेळी केंद्रसरकारसह महाराष्ट्रातील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस भ्रष्ट लोकांना पाठिशी घालत असल्याची टीका केली. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र त्यांना अध्यक्ष करण्यासाठी माणूस मिळत नाही. तसेच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून त्यांच्याजागी दुसरे घेण्यासाठी कुणी सापडत नाही का? कुणाचा दबाव आहे तुमच्यावर? फडणवीसांनी आपल्याला हा भ्रष्टाचार पटत असल्याचे जाहीर करावे किंवा भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी, असे ठाकरे म्हणाले. फडणवीसांना इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर नव्हे तर थीफ मिनिस्टर आहेत. काँग्रेसने त्यांना ही उपमा दिली आहे. चांगला शब्द दिला आहे. त्यामुळे फडणवीसांमध्ये थोडाही स्वाभिमान असेल तर त्यांनी दबाव झुगारून या मंत्र्यांची हकालपट्टी करावी. कारण, इथला दबाव वाढला तर मग तुम्हाला पळता भुई थोडी होईल.
उद्धव ठाकरे|देवेंद्र फडणवीस|चंद्रशेखर बावनकुळे|भाजप|शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष|थीफ मिनिस्टर वाद|महाराष्ट्र राजकारण|खंडणीखोरांचा सरदार|भाजप विरुद्ध ठाकरे|महाराष्ट्र राजकीय बातम्या
🔥 सत्ता हवी? तर हे वाचा!
📚 The 48 Laws of Power – मराठी आवृत्ती
✅ नेते, उद्योजक आणि प्रभावी व्यक्तींसाठी
🔗 इथे क्लिक करून घ्या ➡