Sushma Andhare: Jail filling movement soon across the state against ED

Sushma Andhare: भाजपकडूनच शिंदे गटाला संपविण्याचा प्रयत्न!

पंढरपूर।  भाजप (BJP)वाढविण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप (trap of Devendra Fadnavis)आहे.शिवसेनेच्या (Shiv Sena) ४० आमदारांना भाजपमध्ये घ्यायचे, आणि शिंदे गटाला संपवायचे  हा भाजपचा प्लॅन आहे. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना हे समजत नाही, की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस   कधी नरेंद्र मोदींच्या पदावर दावा ठोकून पंतप्रधान होतील कळणार नाही, अशी खोचक टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की भाजप वाढविण्यासाठी हा देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांना भाजपमध्ये घ्यायचे, आणि शिंदे गटाला संपवायचे  हा भाजपचा प्लॅन आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना हे समजत नाही, की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस भाजप वाढवत कधी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून पंतप्रधान होतील हे कळणार नाही.  असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी हिंदुत्ववादी नाहीत हे सुब्रमण्यम स्वामींचे वक्तव्य गांभीर्यपूर्वक आणि विचार करण्यासारखे आहे. कारण स्वामी हे भाजपचे जुने जाणते नेते आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.(Sushma Andhare: BJP’s attempt to get rid of Shinde group!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *