बारामती| ‘अनिल देशमुख यांच्या घरावर १०९ वेळा छापा मारला गेला. ईडी, सीबीआयची (ED) ( CBI) कारवाई विरोधी पक्षांवर बदला घेण्यासाठी करण्यात येत असून, हे दुर्दैवी आहे. असे काम संविधानाच्या (constitution) विरोधात आहे. याविषयी लोकसभेत (Lok Sabha)आवाज उठविणार आहे,’ अशी रोखठोक भूमिका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडली.
सुळे म्हणाल्या, ‘ईडी आणि सीबीआयची रेड होणार, हे इतरांना आधी कसे कळते? आणि हा विषय आधी कळत असेल, तर राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. याबाबत अमित शहा यांनी कमिटी नेमली पाहिजे. देशाला उत्तर दिले पाहिजे. अनिल देशमुख यांच्यावर सुरुवातीला शंभर कोटी रुपयांचा आरोप करण्यात आला. आता चौकशीअंती ती रक्कम एक कोटीवर आली आहे. मग ९९ कोटींचे काय झाले.असा सवाल करून त्या म्हणाल्या की, आरोप करायचा आणि पळून जायचे ही भारतीय संस्कृती नाही.
सत्तेचा गैरवापर करून लोकांना भीती दाखवत असाल, तर ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे सांगतानाच संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केली आहे.असेही त्या म्हणाल्या.(Supriya Sule: Will raise voice in Lok Sabha against ED, CBI)