supriya sule sharad pawar ajit pawar Political differences and family relations

Supriya Sule:राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या!

पुणे । राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. असे स्पष्ट करताना  राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार (NCP party president Sharad Pawar) यांच्यात झालेल्या भेटीवर पुन्हा भाष्य केले आहे.   उद्योगपती  चोरडियांच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यात काही विशेष गोष्ट घडलेली नाही. चोरडिया हे माझ्या आणि अजित पवारांच्या जन्माच्या आधीपासून शरद पवार यांचे मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये   २ जुलै २०२३रोजी दोन गट पडले.   अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत  सत्तेमध्ये जाताच  शरद पवारांनाच आव्हान दिले. भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे सरकारमध्ये जाणाऱ्या अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर दोन वेळा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरून राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. याच पार्श्वभूमीवर या भेटीत काही विशेष नव्हते असा खुलासा करताना कौटुंबिक भेट असल्याचे सांगण्यात आले होते.  
 अशात आता शरद पवार हे बीडमध्ये सभा घेत आहेत. ते काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे  असणार आहे.  विशेष म्हणजे  हे दोन्ही नेते गेल्या काही दिवसांमध्ये एकमेकांच्या विरोधात काही बोललेले नाहीत.तसेच पक्ष फुटलाय, दोन गट पडले आहेत असेही कुणीही काही बोलत नाही. तसेच  या दोघांची   भेटही चांगलीच चर्चेत आहे. अशात अजित पवार हे माईंड गेम खेळत आहेत का? या प्रश्नावर  सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुळे म्हणाल्या की, 
मला वाटतं की प्रेम असणं काही गैर नाही. आमची लढाई ही काही वैयक्तिक नाही. आमची काही दुश्मनी नाही. आमची लढाई विचारांची आहे. एन. डी. पाटील यांच्या पत्नी म्हणजे शरद पवारांची सख्खी बहीण. तेव्हा कधीही कोणीही म्हणाले  नाही की एन. डी. पाटील एक बोलतात आणि शरद पवार एक बोलतात. आमच्याकडे आमच्या आत्या आणि त्यांचे मिस्टर म्हणजे एन.डी. मामा अनेकदा यायचे. गाठीभेटी व्हायच्या, आम्ही त्यांच्या घरी जायचो, ते आमच्या घरी यायचे. पण म्हणून आमचे राजकीय मतभेद कधीच कमी झाले नाहीत.  असे  सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
अजित पवार उत्तर सभा घेणार आहेत तर तो प्रश्न त्यांना विचारलं पाहिजे. त्यावर मी कसं काय उत्तर देणार? असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले  आहे. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.   चोरडियांच्या घरी जी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यात काही विशेष गोष्ट घडलेली नाही. चोरडिया हे माझ्या आणि अजित पवारांच्या जन्माच्या आधीपासून शरद पवार यांचे मित्र आहेत.याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Supriya Sule: Political differences and family relations are two different things!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *