Has Mohan Bhagwat, Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh changed his party? That's the question I have. While making such a statement, NCP leader Supriya Sule strongly criticized BJP over inflation. BJP leader may have fallen but I still remember his words against inflation, said Supriya Sule.

Supriya Sule:मोहन भागवतांनी पक्ष बदलला?, सुषमा स्वराज यांचा भाजपला विसर!

मुंबई।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी पक्ष बदलला आहे का? असा मला प्रश्न पडलाआहे.  असे वक्तव्य करतानाच  राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे  (NCP leader Supriya Sule) यांनी  महागाईवरून भाजपवर जोरदार टीका केली. भाजप नेत्या  पडला असेल पण मला आजही त्यांचे महागाईविरोधातील  (  inflation))शब्द आठवतात असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रोज रोज मंदिर-मशीद वाद काढू नये, असे वक्तव्य भागवत यांनी केले. मोहन भागवत चांगले बोलले, पण मला त्यांनी पक्ष बदलला का, असा प्रश्न पडला आहे. मागील केंद्र सरकारच्या काळात घरगुती सिलिंडरचे दर वाढले, तेव्हा भाजप नेते (BJP) आक्रमकपणे आंदोलन करीत होते. आता सिलिंडरचा दर १३०० रुपये  (Now the price of a cylinder is Rs. 1300) झाला आहे. तरीदेखील सत्ताधारी मूग गिळून गप्प आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.
 यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज (BJP leader Sushma Swaraj) यांच्या आंदोलनांची आठवण करून दिली. सुषमाजी खूप आक्रमकपणे  महागाईविरोधात (  inflation)बोलत असत. भाजपला त्याचा विसर पडला असेल पण मला आजही त्यांचे शब्द आठवतात. मात्र आज तीच भाजपा १३०० रुपयांना सिलिंडर झाल्यावरही  अवाक्षरही काढत नाहीत.
 
महागाई वाढली… नोटबंदीने काय साधले? 
भाजपाचे लोक, तुम्ही 60 वर्षे काय केले असा प्रश्न करतात, त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,आम्ही सर्व काही केले . शाळा सुरू केल्या, हॉस्पिटल्स सुरू केली. विकासकामे केली. भाजपच्या काळात मात्र केवळ महागाई गगनाला भिडली.
 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मी आदर करते. मात्र  त्यांच्या वक्तव्यातूनच काही प्रश्न निर्माण होतात,याकडेही सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले.  अमित शहा (Amit Shah)म्हणतात की, देशात बनावट नोटांचा सुळसुळाट आहे. तसे  असेल तर तुमच्या नोटबंदीने काय साधले (What has the denomination achieved?), असा थेट सवाल यावेळी त्यांनी केला.तसेच  काश्मीरमधील३७० कलम हटविल्यावर सर्वजण काश्मीरमध्ये जातील, असे बोलले जात होते.मग  किती जणांनी तिथे जमीन खरेदी केली? असा प्रश्नही सुळे यांनी विचारला. (Mohan Bhagwat changes party, forgets Sushma Swaraj’s BJP!) 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *