Supreme Court: खासदारकी परत मिळण्याचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा !

नवी दिल्ली।काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. ‘मोदी आडनाव’ ( ‘Modi surname’) बदनामी प्रकरणात 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.  बी. आर. गवई, जस्टिस पी. एस. नरसिंहा आणि जस्टिस संजय कुमार    यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी निर्णयात जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची कारणे द्यायला हवी होती.

  सर्वोच्च न्यायालयाच्या  या  राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही असेही  आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.शिवाय  राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य योग्य नव्हते , सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगले  पाहिजे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले  आहे.असे असले तरी  राहुल गांधींचा संसदेत परतण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. मोदी आडनावाची मानहानी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने (Gujarat High Court)दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग  (Rahul Gandhi’s way to regain MP) मोकळा झाला आहे.दरम्यान यावर   राहुल गांधी यांनी  एका ओळीत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,“काहीही झालं तरी, भारताच्या कल्पनेचे रक्षण करणे हेच माझं कर्तव्य राहणार आहे”https://twitter.com/RahulGandhi/status/1687409699971321856?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1687409699971321856%7Ctwgr%5Ee49b00f16711f603d0f30df5250bcdfb5dd12682%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Frahul-gandhis-first-reaction-after-the-supreme-court-gave-relief-the-next-plan-was-told-in-two-lines-sgk-96-3834122%2F

 आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर शिक्षा सुनावत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? त्यापेक्षा एक दिवसाची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आले का?” असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकालात काय  म्हटले आहे…

‘ट्रायल कोर्टाच्या निर्णयाचा व्यापक परिणाम झाला आहे. राहुल गांधींचा सार्वजनिक जीवनातील अधिकारच नव्हे तर त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांच्या अधिकारावरही परिणाम झाला. न्यायाधीशांनी कमाल शिक्षा ठोठावण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षेच्या आदेशाला स्थगिती देणे आवश्यक आहे.

 राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला तर दुसऱ्या बाजूने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला असा  युक्तिवाद

  • राहुल गांधी यांनी भाषणात ज्यांची नावे घेतली त्यांच्यापैकी कोणीही गुन्हा दाखल केला नाही. 13 कोटींच्या या ‘छोट्या’ समाजातील केवळ भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले हे विशेष आणि खूप विचित्र आहे!
  • कोणत्याही आरोपामुळे जोपर्यंत व्यक्तीचे नैतिक किंवा बौद्धिक चारित्र्य कमी होत नाही, तोपर्यंत तो व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकत नाही.
  • हा अदखलपात्र गुन्हा आहे. तो समाजाच्या विरोधात नाही… ना खून, ना बलात्कार, ना अपहरण… जास्तीत जास्त 2 वर्षांची शिक्षा… यात नैतिक पतनाचा गुन्हा कुठून आला?
  • राहुल गांधींना 8 वर्षांसाठी गप्प केले जाईल. हिंदीत आपण सभ्य भाषा म्हणतो, मला नाही वाटत असा हेतू असेल…
  • याचिकाकर्त्याला वर्तमानपत्र कटिंगचे व्हॉट्सअप मिळाले. कोणी दिले हे ते सांगत नाही. पुरावा कायद्यानुसार खरी घटना सिद्ध झालेली नाही.

दरम्यान संसदेचे  पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अशा वेळी राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळणार असल्याने विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता लोकसभा सचिवालय किती वेगाने यावर काम करणार ते पाहावे  लागणार आहे. ज्या क्षणी शिक्षेला स्थगिती मिळते त्या क्षणीच खासदारकी पुन्हा मिळते. त्या संबंधी राहुल गांधी यांना लोकसभा अध्यक्षांना त्याची एक प्रत द्यावी लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *