मुंबई। काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावे की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही. असे थेट आव्हान भाजपचे (BJP) दिग्गज नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत.(Sudhir Mungantiwar’s Challenge to Congress leaders) शिवाय आता आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आता ‘नो रुम अॅव्हेलेबल, हाऊसफुल्ल’ असा बोर्ड लावला आहे असे वक्तव्यही केले आहे.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपात येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांशी आमचे बोलणे झाले आहे.असा दावा करताना आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नो रुम अॅव्हेलेबल, हाऊसफुल्ल असा बोर्ड लावला आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरील प्रश्नाला बगल देताना ‘फिजिक्सच्या विषयाला केमिस्ट्रीचा पेपर कसा येईल?’ असा सवाल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा अधिकार असून त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा.असे ते म्हणाले.(Sudhir Mungantiwar’s challenge to Congress leaders) काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगाव की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही.असे आव्हान यावेळी त्यांनी दिले.
NEWS TITLE |Sudhir Mungantiwar| ‘A Congress leader should say, I will not leave Congress till my last breath’