नवी दिल्ली ।भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर (Subramanian Swamy On Modi) निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) त्यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात आर्थिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अपयशी ठरले आहेत असा थेट आरोप तर केलाच आहे शिवाय मोदी हे चीनबाबत ‘अज्ञानी’ आहेत अशी थेट टीकाही केली आहे. आता ‘घरचा आहेर’ मिळाल्याने भाजपमधील (BJP) नेतेमंडळी कोणती प्रतिक्रिया देतात, याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एका ट्विटमध्ये (tweet)स्वामी म्हणाले की, गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात मोदी आर्थिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच, ( 2016)पासून आर्थिक वाढीचा दर दरवर्षी घसरला आहे असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले आहे.
त्यात स्वामी यांनी सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षाही कमकुवत झाली आहे. भारत-चीन संबंध पुन्हा रुळावर आणण्यास वाव असताना पंतप्रधान मोदी हे चीनबाबत विनाकारण अनभिज्ञ आहेत. ते कसे सोडवता येईल हे मोदींना माहीत आहे का? असा थेट प्रश्नच स्वामी यांनी उपस्थित केला आहे.