Various questions are being raised after a major reshuffle in the Bharatiya Janata Party's parliamentary committee on Wednesday. Nitin Gadkari and Shivraj Singh Chauhan have been removed from the parliamentary board. Meanwhile, senior BJP leader Subramanian Swamy has reminded the old tradition of BJP by tweeting. However, while replying to a Twitter user, he has accepted that the democracy in the party is over.

Subramanian Swamy criticize pm modi: भाजपमध्ये कुठेही निवडणूक होत नाही,लोकशाही संपली!

नवी दिल्ली  भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीत (Bharatiya Janata Party’s parliamentary committee) बुधवारी मोठे फेरबदल झाल्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना संसदीय मंडळातून काढण्यात आले आहे. अशात आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ट्विट करून भाजपच्या जुन्या परंपरेची आठवण करून दिली आहे.मात्र  एका ट्विटर युजरला उत्तर देताना त्यांनी पक्षातील लोकशाही संपल्याचे मान्य केले आहे.एकप्रकारे त्यांनी भाजपलाच ‘घरचा आहेर’ (Subramanian Swamy criticize pm modi ) दिला आहे.  

जनता पक्षाच्या काळात पूर्वी संसदीय पक्षाची निवड व्हायची ज्याद्वारे पदाधिकारी निवडले जात होते. पक्षाच्या संविधानानुसार असे करणे गरजेचे असयाचे. मात्र आज भाजपमध्ये कुठेही निवडणूक नाही. प्रत्येक पदाची निवड नामांकनाच्या आधारे केली जाते आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घ्यावी लागते, अशी खंत सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली होती. त्यावर एकाने पक्षांतर्गत लोकशाही नाही, मग ते देशातील लोकशाही कशी वाचवणार असे कमेंट केले होते. यावर तुम्हाला हे आता कळले, असे उत्तर सुब्रमण्य स्वामी यांनी केले आहे. यावरून स्वामी भाजपच्या कार्यपद्धतीशी सहमत नसल्याचे समजून येत आहे.
भाजपने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  (Nitin Gadkari and Shivraj Singh Chauhan)यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जेपी नड्डा हे या संसदीय मंडळाचे आणि भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. सर्वानंद सोनोवाल आणि बीएस येदियुरप्पा यांचा भाजपच्या बोर्डात समावेश करण्यात आला आहे. संसदीय मंडळ ही भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था आहे. पक्षाचे सर्व मोठे निर्णय या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळात स्थान मिळाले नाही, परंतु त्यांना निवडणूक समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय वनमंत्री भूपेंद्र यादव आणि मूळचे राजस्थानचे असलेले ओम माथूर यांनाही या निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. गडकरी आणि शिवराज चौहान यांना संसदीय बोर्डातून काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांचे हे ट्विट आल्याने पक्षात नाराजी आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Subramanian Swamy criticize pm modi)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *