Split in Shiv Sena: Thackeray - Shinde - Fadnavis on one platform 'face to face'!

Split in Shiv Sena:ठाकरे – शिंदे – फडणवीस एका व्यासपीठावर ‘आमने – सामने ‘ !

मुंबई । शिवसेनेला सुरुंग लावून भाजपच्या ‘ कुबड्या’द्वारे सत्ता भोगणारे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे (Eknath Shinde)  आणि शिवसेनेतील बंडाळीमध्ये ‘आमचा संबंध नाही ‘ अशी आधी  भूमिका मांडणारे पण नंतर ‘ बदला’ घेतल्याचे जगजाहीर करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे येत्या २३ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यासमवेत एका व्यासपीठावर ‘आमने – सामने ‘ येणार असल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.  

  23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तवली जात  आहे. त्यात उद्धव ठाकरे    यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे.त्यामुळे  ते  हे निमंत्रण स्वीकारतात कि नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  
नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील चर्चेत सहभाग  घेतला. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही त्यावेळी  उपस्थित नव्हते. त्यामुळे हे तीन नेते अजूनपर्यंत ‘आमने -सामने’  आलेले नाहीत. 
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणारच आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. मात्र उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर ठाकरेंनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारले तर तिघे नेते एकत्रित दिसतील. 
उद्धव ठाकरे जर या कार्यक्रमाला आले तर सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांना सोबत पाहण्याचा दुर्मिळ योग जुळून येणार आहे. तिन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार? ते एकमेकांशी संवाद साधतील का ? हेही  पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या दृष्टीने 23 जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभास प्रसिद्ध सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे.(Split in Shiv Sena: Thackeray – Shinde – Fadnavis on one platform ‘face to face’ !)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *