Sonia Gandhi's son-in-law to enter Lok Sabha arena!

Sonia Gandhi’s son-in-law:सोनिया गांधी यांचे जावई उतरणार लोकसभेच्या आखाड्यात!

नवी दिल्ली।पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या असताना उत्तर प्रदेशात  गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी कॉंग्रेस    झटत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी अधिक सक्रीय आहेत. याचवेळी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवावी अशी सर्वाची इच्छा असल्याचे बोलून दाखविले आहे.त्यामुळे आगामी लोकसभेच्या आखाड्यात काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचे जावई उतरतात की नाही यावर आगामी काळात राजकीय आखाड्यात चर्चा झडणार आहे. त्यातही लोकसभा  निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्याचा लाभ पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी किती होतो याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुरादाबाद किंवा उत्तर प्रदेशातील कोणत्याही शहरातून रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक रिंगणात उतरावे आणि लोकसभेत खासदार म्हणून प्रवेश करावा अशी लोकांची इच्छा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मुरादाबाद हे रॉबर्ट वाड्रा यांचे जन्मगाव आहे.रॉबर्ट वाड्रा पुढे म्हणाले कि, २०२४ ची  निवडणुक लढवेल किंवा नाही हे आत्ताच सांगता येणार नाही;मात्र  सध्या मी जनतेची सेवा करत आहे. निवडणूक असो वा नसो, देशातील सर्व मंदिरे, चर्च, गुरुद्वारामध्ये मी जातो. दीर्घकाळ मेहनत करतोय. राजकारणात मी अशी एन्ट्री घेईन कि राजकारणात बदल होणारच. जेथे निवडणूक लढवेन तेथील जनतेचा विकास होणारच. प्रियांका घरी असते तेव्हा दोघात राजकारणावरच  चर्चा होते, गावागावातून जनता कशी त्रासलेली आहे यावरच चर्चेचा भर असतो.

उत्तर प्रदेशापुरते मर्यादित की,… 

प्रियांका उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होतील का असे विचारल्यावर रॉबर्ट वाड्रा म्हणाले, राहुल आणि प्रियांका पदाचा विचार करून काम करत नाहीत. राजकारण त्यांच्या रक्तात आहे. जनतेसाठी ते मेहनत करतात. प्रियांका राष्ट्रीय नेता आहे. त्यामुळे फक्त उत्तर प्रदेशापुरते मर्यादित राहायचे कि देशाचे राजकारण करायचे याचा निर्णय तीच घेईल,असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *