Sonia Gandhi slaps 'them' on Modi case!

मोदी प्रकरणावर सोनिया गांधींनी ‘ त्यांना ‘ फटकारले!

नवी दिल्ली |पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याच्या सुरक्षेतील त्रुटीच्या 24 तासांनंतर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चन्नी यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे. मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी चन्नी यांना सांगितले.या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करावी, असे सोनिया गांधी यांनी  चन्नी यांना सांगितले.

या दौऱ्यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवायला हवी होती.पंजाब सरकार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याचे चन्नी यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि राज्याचे गृहसचिव अनुराग वर्मा यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला 3 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात जो कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल.मात्र एकीकडे चन्नी यांनी द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे तर दुसरीकडे ते चूक नाकारत आहेत. त्यांनी तत्पूर्वी पत्रकार परिषद बोलावून यात कोणतीही चूक नसल्याचे स्पष्ट केले . शेवटच्या क्षणी रस्त्याने जाण्याचा मार्ग पंतप्रधान मोदींनीच बनवला. आता पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कसूर केल्याचा बहाणा करून पंजाब आणि पंजाबींची बदनामी केली जात असल्याचा रोख तो निवडणूक रॅलींमधून काढत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *