सोलापूर ।स्वतंत्र मराठवाड्याच्या ( (Demanding independent Marathwada)) मागणी करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंची सोलापुरातील पत्रकार परिषद संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade)कार्यकर्त्यांनी उधळून लावली. कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या अंगावर काळी पावडर फेकत सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केल्याने पत्रकार परिषद थोडक्यात आटोपून सदावर्तेंनीही काढता पाय घेतला.दरम्यान आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असल्याचा गंभीर आरोप सदावर्तेंनी( Gunaratna Sadavarte) केला आहे.
स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी (Demanding independent Marathwada)अॅड. गुणरत्न सदावर्ते सध्या राज्यभरात संवाद परिषद घेत आहे. यानिमित्त सोलापुरात पत्रकार परिषद घेत असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या अंगावर काळी फावडर फेकली. विशेष म्हणजे काल उस्मानाबाद शहरातही सदावर्ते यांना संभाजी ब्रिगेडतर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले होते. तसेच, त्यांच्या कार्यक्रमाते बॅनरही फाडण्यात आले होते.
गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा सुरुवातीलाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते गुपचूपपणे सदावर्तेंच्या मागे जाऊन उभे राहिले. काही क्षणानंतर त्यांनी सदावर्तेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व त्यांच्या अंगावर काळी पावडर फेकली. सदावर्ते यांच्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे, असा आरोप करत सदावर्ते यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. यावेळी संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे हस्तक आहे. महाराष्ट्राच्या भूमीला, प्रबोधनाच्या भूमित उद्धवस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्र संतांची, प्रबोधनाची, फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारांची भूमी आहे. त्यामुळे या भूमीला अबाधित राखू. सदावर्तेंचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही.
हल्ल्यामागे नक्षली संबंध
आपल्यावरील हल्ल्यामागे नक्षली संबंध असल्याचा गंभीर आरोपही सदावर्ते यांनी केला. सदावर्ते म्हणाले, आम्ही शिवरायांचे, बाबासाहेबांचे मावळे आहोत. त्यामुळेच आमच्यावर हल्ले केले जात आहे. या हल्ल्यामागे नक्षली संबंध आहे. अशा लोकांमुळे आम्ही घाबरणार नाहीत. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांनी योग्य खबरदारी घेतली पाहीजे.