Savarkar ordered rape as a political weapon against the opposition, claiming that rape was a political weapon, claimed former minister Vijay Wadettiwar's daughter Shivani Wadettiwar. He has also tweeted such a video. Shivani's statement is likely to create controversy again. Now we have to see what position loan lovers and academics take and how they answer.

Shivani Wadettiwar:… सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे?

मुंबई ।सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा (Savarkar ordered rape as a political weapon against the opposition) आदेश दिला, ते बलात्कार हे राजकीय हत्यार आहे असे सांगत, असा दावा दावा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar)यांनी केला. त्यांनी तसा व्हिडिओही ट्विट केला आहे.

शिवानी यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता यावर सावकरप्रेमी आणि अभ्यासक काय भूमिका घेतात आणि कसे उत्तर देतात हे पाहावे लागेल. 

शिवानी यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता यावर सावकरप्रेमी आणि अभ्यासक काय भूमिका घेतात आणि कसे उत्तर देतात हे पाहावे लागेल. 

फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा दावा करणाऱ्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका मेळाव्यात सावरकरांविषयी हे वक्तव्य केले. शिवसेना-भाजपने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेच्या विरोधात बोलताना शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला असल्याचा दावा केला आहे.

शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, शिवसेना-भाजप कधीच फुले – शाहू – आंबेडकर गौरव यात्रा काढणार नाही. ते फक्त सावरकरांचीच गौरव यात्रा काढतील, पण माझ्यासारख्या महिला भगिनीला त्यामुळे कसे सुरक्षित वाटेल? कारण सावरकरांनी आपल्या विरोधकांविरुद्ध बलात्कारासारख्या राजकीय हत्याराचा वापर करायचे आदेश दिले होते.एकीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी सहन करणार नाही असे, उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या भर सभेत जाहीर केले होते. मात्र, महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांकडून सावरकरांचा अपमान सुरूच आहे. यात राहुल गांधींच्या पुढे जात शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र डागले आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्याला आपण मानत नाही, हेच काँग्रेस नेते दाखवून देत आहेत. त्यामुळे ठाकरे काय भूमिका घेतात, हे औत्सुक्याचे असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *