सोलापूर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Chief Minister Eknath Shinde)शिवसेनेत बंड केल्यानंतर सगळ्यात पुढे होते ते, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil). ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटिल’ या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शहाजीबापू हे संपूर्ण राज्यभर फिरून शिंदे गटाची भूमिका मांडताना दिसत आहेत. मात्र आता शहाजीबापूंना त्यांच्याच मतदार संघात घेरण्याची रणनीती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena party chief Uddhav Thackeray) यांनी केली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (OBC leader Laxman Hake) यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजीबापू पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यानंतर आता येत्या रविवारी सांगोल्यात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत लक्ष्मण हाके यांनी शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. सांगोल्यात या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे.
येत्या रविवारी सांगोल्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात सकाळी ११ वाजता सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे. (Shiv Sena’s strategy: ‘Elgar’ in Shahjibapu’s constituency)