Shiv Sena's question to BJP: Why didn't they speak on 'Ajaan' during elections in Uttar Pradesh

Shiv Sena’s question to BJP:उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकीवेळी ‘अजाण’वर  का नाही बोलले!

 मुंबई ।भाजपच्या या अजानबंदीच्या भूमिकेवर (BJP’s role) शिवसेना प्रवक्त्या (Shiv Sena spokesperson Manisha Kayande) मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे ( BJP ) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा व्हिडीओ बाईट मी ऐकला आहे. खर म्हणजे अजान एक प्रार्थना आहे. आता ती नुसतीच की लाऊडस्पीकरवर हा विषय असल्याचे मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.
  पत्रकार परिषद घेऊन मुंबईसहीत महाराष्ट्रभरातील लाऊडस्पीकरवरील (prayer on loudspeakers) अजान बंद झाले पाहिजेत, अशी पक्षाची भूमिका असल्याचे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. अजानचा वापर जुन्या काळामध्ये वेळ कळण्यासाठी केला जायचा. मात्र  आज सगळ्यांकडे घड्याळ, मोबाईल असल्यामुळे आता अजानची गरज नाही  अशी भूमिका लाड यांनी मांडली आहे. तसेच हे अजान आम्ही बंद करुन राहणारच असे सांगताना केवळ हिंदू सणांना का विरोध केला जातो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या याच भूमिकेवर शिवसेनेने पहिली रोखठोक  प्रतिक्रिया दिली आहे.

 शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी  थेट मुद्द्यावर बोट ठेवून भाजपला कोंडीत पकडले आहे.  उत्तर  प्रदेश निवडणुकीच्या वेळेस हा मुद्दा का काढण्यात आला नाही, असा प्रश्न  कायंदे यांनी भाजपला विचारला आहे.

मला सांगा उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत्या. तिथे मशिदी नाहीत का? मग तिकडे मशिदींवर लाऊड स्पीकर्स नाहीत का? त्यांच्या निवडणुकांच्या अगोदर हा विषय तुम्हाला का सुचला नाही?, असे प्रश्न कायंदे यांनी उपस्थित केले आहेत.हिंदू-मुस्लीम दंगे व्हावेत यासाठी आता हे सगळे विषय मुद्दाम आहेत. जे सगळे एकोप्याने राहत आहेत, त्यात कुठेतरी दंगे व्हावेत.  त्या दंग्यांचा फायदा भारतीय जनता पक्षाला व्हावा. हाच यामागील हेतू असल्याचा आरोपही कायंदे यांनी केला आहे.

… तेंव्हा फडणवीसांना हे सगळं सुचले नाही!

तुम्ही एखाद्या धर्माबद्दल बोलत आहात. त्या धर्माचा तुम्ही अभ्यास केला आहे का? नेमका त्या धर्माच्या काही अनिष्ठ रुढी असतील, त्यावर तुम्ही बोलू शकता. पण तुम्ही त्याचा अभ्यास केला आहे का? तुम्ही कोणत्या अधिकार वाणीने हे सगळे बोलता?, असेही कायंदे यांनी विचारले आहे.

पुढे बोलताना, राहिला विषय लाऊडस्पीकरचा तर त्याबद्दल न्यायालयाचे निकाल असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.तसेच, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जेव्हा पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे गृहखाते पाच वर्ष होते. तेव्हा त्यांना हे सगळं सुचले नाही. मग आताच महाविकास आघाडी सरकार असताना मुद्दाम दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केले जात असल्याचेही कायंदे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *