Shiv Sena's question: MP Rahul Shewalen should be investigated by 'NIA'; Where does Shiv Sena's question come?

Shiv Sena’s question: खासदार राहुल शेवाळेंची   ‘एनआयए’कडून  चौकशी करा; शिवसेनेचा प्रश्न येतो कुठे? 

मुंबई।दाऊद इब्राहिम, पाकिस्तान, आयएसआयशी संबंधित महिलेशी खासदार राहुल शेवाळेंचे (MP Rahul Shewale) संबंध होते व ते संबंध सरळमार्गी नव्हते. संबंधित महिलेसोबत राहुल शेवाळेंचे जे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध झाले आहेत ते गंभीर तसेच अनैतिक आहेत. लिफ्टमध्ये, हॉटेलमध्ये व इतर अन्य ठिकाणी खासदार व महिलेचे (relationship between the MP and the woman) घनिष्ठ नाते स्पष्ट दिसते. संबंधित महिलेसोबतचे जे चित्रण प्रसिद्ध झाले त्याचे चित्रीकरण विविध ठिकाणी याच प्रेमी युगुलाने केले आहे. येथे शिवसेनेचा प्रश्न येतोच कोठे?, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Shiv Sena’s question) करण्यात आला  आहे.

  सामनाच्या  अग्रलेखात म्हटले आहे की, दिल्लीच्या भाषेत ज्यास ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला. हे गंभीर आहे. शेवाळे यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक व राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे शिवसेनेचे लोक आहेत. शेवाळे यांचा हा दावा खरा नाही.

मुखपत्रात शिवसेनेने म्हटले आहे की, संबंधित महिलेसोबतचे जे चित्रण प्रसिद्ध झाले त्याचे चित्रीकरण विविध ठिकाणी याच प्रेमी युगुलाने केले आहे.बाकी राष्ट्रीय तपास यंत्रणेत देशभावना जागरूक असेल तर महाराष्ट्रातील खासदारांच्या कबुतरबाजीचे प्रकरण खणून काढील व ती कोणाचीही गय करणार नाही. फुटीर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून व खासकरून ‘एनआयए’कडून  (investigated by the Central Investigation Agency and especially by the NIA)तत्काळ चौकशी व्हायला हवी. एका महिलेचे प्रकरण शेवाळे यांच्या अंगावर शेकले आहे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा मामला आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊदसंबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ईडी-एनआयएने ठेवला व त्यांना अटक केली. त्यापेक्षा गंभीर प्रकरण संसदेचे सदस्य राहुल शेवाळे यांचे दिसते.

 राष्ट्रीय सुरक्षेची माहिती पुरवली काय? शिवसेनेने दावा केला आहे की, संबंधित महिला आपल्याला आता ब्लॅकमेल करते व मी तिची तक्रार केली असल्याचे खासदारांनी सांगणे हा खोटारडेपणा आहे. मुळात अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद असलेल्या महिलेच्या प्रेमात खासदार अडकले. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती या खासदाराने त्या महिलेला पुरवली काय? हनी ट्रॅपमध्ये खासदार अडकले आहेत व संबंधित महिलेच्या विरोधात आपण कोठे व कशा तक्रारी केल्या याबाबत त्यांनी खुलासे द्यायला सुरुवात केली आहे, पण ही सर्व पश्चातबुद्धी आहे. या महिलेशी संबंधित खासदारांचे अत्यंत प्रेमाचेच संबंध होते व या महिलेस लग्नाचे वगैरे वचन देऊन खासदारांनी नाते घट्ट केले. हे नाते घट्ट होते, तोपर्यंत दाऊद, पाकिस्तानशी संबंध असल्याचा साक्षात्कार खासदार महाशयांना झाला नाही.

  शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्या चार महिन्यांतच शेवाळे व इतरांचा नैतिकतेचा मुखवटा गळून पडला आहे. दिल्लीच्या भाषेत ज्यास ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला. हे गंभीर आहे. पाकिस्तान आले की, आयएसआयचे जाळे आले व आपल्या देशातील राजकारण्यांना अशा जाळय़ात अडकवले जाते. खासदार शेवाळे हे त्या आयएसआयच्या जाळय़ात होते काय व त्यांनी दुबई, तसेच दुबईमार्गे अन्य कोठे प्रवास केला काय? ते कोणाला भेटले व त्यांच्याबरोबर अन्य काही खासदार होते काय? या खासदारांकडून राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत गेली तर नाही ना, याची चौकशी एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने करायला हवी.असेही शिवसेनेने मुखपत्रात म्हटले आहे.

देशाच्या सुरक्षेस सुरुंग  राष्ट्रीय तपास यंत्रणेने चालढकल केलीच तर हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या टेबलावर नेला पाहिजे, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, या कबुतरबाजीने देशाच्या सुरक्षेस सुरुंग लागला आहे. या सुरुंगाची दारू संसदेच्या सभागृहात पोहोचली असेल तर गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांना कठोर पावले उचलावी लागतील. खासदार शेवाळे यांचे कबुतरबाजीचे प्रकरण ‘अंडरवर्ल्ड’शीही संबंधित आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना या प्रकरणात आडाला तंगडय़ा लावून बसता येणार नाही. ‘26/11’चा हल्ला आपल्याकडील घरभेद्यांमुळेच झाला. त्याआधीच्या बॉम्बस्फोट मालिकांत दाऊदचे हस्तक सहभागी होते; पण तेथेही आयएसआयने फितुरीचे बीज रोवले होते. आता शेवाळे प्रकरणात फितुरी, हेरगिरीचा संदर्भ आहे व त्याचा खुलासा स्वतः शेवाळे यांनीच केल्यामुळे तपास यंत्रणांचे काम सोपे झाले. या कबुतरबाजीत खासदार शेवाळे एकटे नाहीत व त्यांच्यासोबत आणखी काही खासदार असावेत अशी माहिती समोर येत आहे.

… खुलासे झाले तर महाराष्ट्र सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेल शिवसेनेने म्हटले आहे की, या महिलेचा दाऊद व पाकिस्तानशी संबंध असल्याची माहितीही स्वतः खासदार महोदयच देत आहेत. आता काय करायचे? आता प्रश्न या महिलेच्या सुरक्षेचा निर्माण होतो. एकतर या महिलेस महाराष्ट्राचे पोलीस अटक करतील व तिचे तोंड कायमचे बंद केले जाईल किंवा अन्य काही घडवले जाईल व शेवटी या प्रकरणातही खासदार शेवाळे यांना ‘क्लीन चिट ‘देण्याचाच प्रयत्न होईल. या प्रकरणात शेवाळे यांच्यासोबत इतर खासदारांचीही नावे येऊ शकतात व संबंधित महिला चौकशीत अन्य धक्कादायक खुलासे करण्याची भीती वाटते. असे खुलासे झाले तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार अनैतिकतेच्या कुबडय़ांवर उभे आहेच, पण ते व्यभिचार व देशद्रोहय़ांच्या पायावरही टिकले आहे.याकडेही मुखपत्रातून शिवसेनेने लक्ष वेधले आहे. (Shiv Sene’s question: MP Rahul Shewalen should be investigated by ‘NIA’; Where does Shiv Sena’s question come?)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *