After Chief Minister Eknath Shinde revolted in Shiv Sena, Sangola MLA Shahaji Bapu Patil was at the forefront. Shahjibapu, who came into the limelight due to his dialogue 'Kay Jadi, Kay Dongar, Kay Hatil', is seen going around the entire state presenting the role of the Shinde group. But now Shiv Sena party chief Uddhav Thackeray has made a strategy to surround Shahajibapu in his own constituency.

Shiv Sena’s Affidavit: शिंदे सरकार विषारी झाडाचे फळ,भाजपकडून मदत

मुंबई । राज्यातील सत्ता संघर्षानंतर ठाकरे शिवसेनेकडून  (Thackeray Shiv Sena)१६ आमदारांचे निलंबन करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे मागणी झाली होती. त्या विरोधात शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र सुनावणीपूर्वी शिवसेनेकडून (SHIVSENA ) प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. त्यामध्ये ठाकरे गटाने महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार  (Eknath Shinde government) विषारी झाडाचे फळ असल्याचे म्हटले आहे. फ्लोअर टेस्ट आणि नवीन मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची नियुक्तीसह सर्व घटना विषारी झाडाचे फळ आहे. त्यांच्या बाजूने बंडखोर आमदारांना पेरले आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात केला आहे.शिवाय भाजपच्या  (BJP) कार्यकर्त्यांनी मदत केल्याचेही नमूद केले आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून (Uddhav Thackeray’s Shiv Sena) प्रतिज्ञापत्रात, शिंदे गटाच्या आमदारांनी घटनात्मक पाप केले आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार नापाक हातांनी सर्वोच्च न्यायालयात पोहचल्याचे म्हटले आहे. त्यांनी उपाध्यक्ष विरोधातील अविश्वास ठराव याबाबत चुकीचे विधान केले आहे. पक्षविरोधी कारवाईपासून वाचण्यासाठी बंडखोर आमदारांनी खरी शिवसेना असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्र सोडून भाजप शासित गुजरात राज्यात का जावे लागले ? हे समजत नाही. पुढे आसाममध्ये भाजपच्या मांडीवर बसावे लागले. गुजरात (Gujarat) आणि आसाममध्ये (Assam) शिवसेनेचे एकही केडर नव्हते हे वेगळे सांगायची गरज नाही. आमदारांना संपूर्ण साधन सामग्री पुरवणारे भाजपचेच कार्यकर्ते होते, असे प्रतिज्ञापत्रात  लिहिले आहे.(Shiv Sena’s Affidavit: Shinde Govt Fruit of the Poisonous Tree, Help from BJP)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *