मुंबई।राज्यसभा निवडणुकीत पहिल्या फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतं जास्त असतानाही दुसऱ्या फेरीत आकड्यांची व्यवस्थीत ‘गोळाबेरीज’ करुन भाजपाचा (BJP)उमेदवार विजयी झाला होता. त्यावरून दगाबाजी झाल्याचा आरोप करत शिवसेना नेते संजय राऊतांनी थेट आमदारांची नावे घेतली होती. आता विधान परिषदेच्या (Legislative Council)निवडणुकीत असाच दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना ( SHIVSENA ) सतर्क झाली आहे.
या विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council) शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. आणि या दोन्हीही उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेना आपल्या आमदारांची विशेष काळजी घेत आहे.
विधान परिषदेच्या (Legislative Council elections) १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतांची जुळवाजुळव सुरु आहे. एकप्रकारे सर्वच पक्ष आता ‘हाय अलर्ट’वर आहेत. मात्र राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद झाले होते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन शिवसेना आता जास्त खबरदारी घेत आहे. त्यातही राज्यसभा निवडणुकीवेळी दोन दिवसीय कार्यशाळा घेऊनही सेनेचे एक मत बाद झाले होते आणि पारडं जड असतानाही संजय पवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेनेने आता आमदारांना सक्त आदेश दिले आहेत. जर मत बाद झाले किंवा काही दगाफटका झाला तर पक्ष कडक कारवाई करणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले आहे. (Shiv Sena leaders have said that the party will take strict action if the vote is rejected or there is some scuffle)