मुंबई ।मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात भाजपचे (BJP’s Kirit Somaiya) किरीट सोमय्यांसह काही जणांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिले आहे. या कटात मुंबईतील काही धनिक, भाजपचे (BJP) काही लोक यांच्या संगनमताने सोमय्या नेतृत्व करत आहेत. काही करुन त्यांना मुंबई केंद्रशासित करायची आहे. हा भाजपचा कट असून हे सगळे महाराष्ट्रद्रोही असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते खासदार (Shiv Sena MP Sanjay Raut) संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, किरीट सोमय्या हे दोन कारणांसाठी दिल्लीला जात असतात. एक म्हणजे खोटे कागद घेऊन जायचे व दुसरा कट आहे तो मुंबई केंद्रशासित करण्याचा. मुंबईतील काही धनिक, बिल्डर यांच्या संगनमताने किरीट सोमय्या हा कट रचत आहेत. मुंबई कशी केंद्रशासित करता येईल त्याचं प्रेझेंटेशनही तयार आहे. त्यांना मुंबईतल्या मराठी माणसाचा अधिकार काढून घ्यायचा आहे आणि मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे आहे ,असाही आरोप संजय राऊत यांनी केला.