Shiv Sena leader Sushma Andhare: Apologies for the 'that' statement ; But warkari Aghadi's leaders are advised

Shiv Sena leader Sushma Andhare:’त्या’ वक्तव्याबद्दल माफी;पण वारकरी आघाडीच्या नेत्यांना सल्लाही!

पुणे ।माझ्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांनी माझी प्रतीकात्मक अंतयात्रा काढली. या देशात अनेक सुधारकांच्या प्रेतयात्रा काढण्यात आलेल्या असून  भाजपच्या वारकऱ्यांनी माझी दखल घेतल्याबद्दल आनंदी असल्याचे शिवसेनेच्या नेत्या  सुषमा अंधारे (Shiv Sena leader Sushma Andhare) यांनी स्पष्ट करताना  वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी वारकरी आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्म, संत आणि वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले  होते. त्यानंतर राज्यातील वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत वक्तव्याबद्दल माफी मागितली.मात्र   सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) टीका करत असल्यामुळे  माझे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. कबीरपंथीय असल्याने  मी कुणाच्याही श्रद्धेच्या आड यायचे  नाही, मी कर्मकांड न मानता चैतन्य मानते. तरीदेखील माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजपच्या वारकऱ्यांच्या गटाकडून सूडबुद्धीने विरोध केला जात असल्याची टीका अंधारेंनी केली आहे.

  सुषमा अंधारे म्हणाल्या की, राजकीय सूडबुद्धीतून माझा विरोध करण्यात येत असून यात भाजप (BJP)पुरस्कृत वारकरी आघाडीचेच लोक आहेत. कोरोनाकाळात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध करणारे आचार्य तुषार भोसले आणि ह.भ.प. गणेश शेटे हेच होते. तेच आता मला विरोध करत असून जे लोक कधीच वारीत पायी चालले नाही, त्या लोकांनी कोरोनाकाळात स्टंट केला होता, असे सांगत सुषमा अंधारेंनी भाजपच्या वारकरी आघाडीवर सडकून टीका केली आहे.

 काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात त्यांनी म्हटले  आहे की, संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली त्यामुळे  त्यांना माऊली म्हटले  गेले . पण  माझ्या वडिलांचे  निधन झाल्यानंतर माझ्या आईने  १५ एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवले , ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असायला हवी, असे  वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले  होते.मात्र त्या जुन्या व्हिडीओवरून आता अंधारे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. (Shiv Sena leader Sushma Andhare: Apologies for the ‘that’ statement ; But warkari Aghadi’s leaders are advised!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *