Shiv Sena chief Uddhav Thackeray has resigned as a member of the Legislative Council along with the post of Chief Minister. So now this vacant seat is being claimed by Shinde group and Shiv Sena. As the Shinde group and Shiv Sena will once again compete for this seat, the attention of the political circle has turned to who will get this vacant seat.

Shiv Sena: ‘त्या’ जागेवरून आता शिंदे गट – शिवसेना ‘आमने – सामने’

मुंबई ।  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी  (Shiv Sena chief Uddhav Thackeray)मुख्यमंत्री पदाबरोबरच विधानपरिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.( Uddhav Thackeray Resign MLA Seat) त्यामुळे आता   या रिक्त झालेल्या जागेवर  शिंदे गट आणि शिवसेनेकडून (Shiv Sena) दावा ठोकला जात आहे. या जागेवरून पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेना  (Shinde group and Shiv Sena) आमने सामने  येणार असल्याने आता कुणाच्या पदरात ही रिक्त जागा जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता दिवसागणिक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याने  शिवसेनेला  खिंडार पडत  आहे. त्यात शिंदे गटाकडून शिवसेना ही  आमचीच  असल्याचा दावा केला जात आहे. तर पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे  यांनी कंबर कसली आहे. तसेच न्यायालयीन लढाईतून शिंदे गटाला आव्हानही दिले   आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेची जागा कोणाची यावरून आता दोन्ही गटात दावे – प्रतिदावे सुरू झाले आहेत. परिणामी वातावरण पेटले आहे. (Shiv Sena: From ‘that’ place now Shinde group – Shiv Sena ‘face to face’)  विधान परिषदेच्या जागेवर शिंदे गटाकडून रामदास कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेकडून आक्रमक आणि कट्टर शिवसैनिकाला विधान परिषदेत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेत सध्या गळती वाढत असल्याने नावाबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *