n the Rajya Sabha elections, the Shiv Sena candidate in the first round had more votes, but in the second round, the BJP candidate had won by rounding up the numbers. Shiv Sena leader Sanjay Raut had directly named the MLAs alleging fraud. Now, Shiv Sena has become alert so that such a scuffle does not take place in the Legislative Council elections. Two Shiv Sena candidates are in the fray in this Vidhan Parishad election.

Shiv Sena criticizes MNS-BJP: महागाई व बेरोजगारीचा आक्रोश दडपण्यासाठी ‘भोंगे’ वाजविण्याची शक्कल

मुंबई ।देशातील जातीय आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमविणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, अशा पोरखेळांनी व प्रायोजित कार्यक्रमांनी कोणाला हिंदूंचे सम्राट वगैरे होता येणार नाही.अशा शब्दात शिवसेनेचे ( SHIV SENA ) मुखपत्र ‘सामना’ मधून ‘एका दगडा’तच्या धर्तीवर   मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह (  Raj Thackeray)  भाजपवरही  (BJP) बोचरी टीका करण्यात आली आहे. 

 विकासाची ब्लुप्रिंट, प्रखर विरोधी पक्ष अशी भूमिका घेणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र  (  role of a blueprint for development and a fierce opposition party, has now embraced fanatical Hindutva.)आता कट्टर हिंदुत्वाची कास धरली आहे. त्यासाठी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. त्यावरून भर उन्हाळ्यात राज्याचे  राजकारण तापले आहे. राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याच्या (issue of bhongya on the mosque) बाबतीत घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेनेकडून टीकाही केली जात आहे. त्यात आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून राज ठाकरेंवर टीकेची तोफ डागण्यात आली मात्र त्यात भाजपलाही अप्रत्यक्ष लक्ष्य करण्यात आले असले तरी राज ठाकरे यांनाच ‘ रडार’ वर ठेवले आहे.  

भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा… 

बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना मात्र हिंदूंचे असदुद्दीन ओवेसी व्हायची घाई झाली आहे. ही इतकी घाई बरी नाही हे त्यांना सांगायचे कोणी? या दोन्ही ओवेसींना भारतीय जनता पक्षाने मांडीवर घेतले असून 2024 च्या (preparations for the 2024 elections)  निवडणुकांची तयारी त्या माध्यमातून सुरू केली आहे.महाराष्ट्रात दोन ओवेसी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत व केंद्राचे सरकार हा सर्व प्रकार मूक दर्शक बनून पाहत आहे.चांगल्या राज्यकर्त्याचे हे लक्षण नाही. ब्रिटिशांनी ‘फोडा, झोडा व राज्य करा’ याच नीतीचा अवलंब केला. देशी राज्यकर्त्यांना राज्य करण्यासाठी त्याच नीतीचा अवलंब करावा लागत असेल तर स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वायाच गेली. दुसरे काय म्हणायचे.अशी रोखठोक भूमिका शिवसेनेने मांडली  आहे. 

मोदी राज्यात रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने दंगली… 

देशातील जातीय आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमविणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, अशा पोरखेळांनी व प्रायोजित कार्यक्रमांनी कोणाला हिंदूंचे सम्राट वगैरे होता येणार नाही.असा थेट टोला अग्रलेखातून मारण्यात आला आहे शिवाय तयारी म्हणजे काय? तर देशाचे वातावरण साफ बिघडवून टाकायचे. काँगेस राजवटीत दंगली होत असल्याचा ठपका सतत ठेवला जात होता, पण मोदी राज्यात रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने दंगली घडविल्या जात आहेत त्याचे काय?असा रोखठोक सवालही उपस्थित केला आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट होते, पण ते धर्मांध नव्हते. एकदा त्यांनी स्पष्टच सांगितले, ‘‘मला हिंदूंना जागे करायचे आहे, पण मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही.’’याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. 

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली व त्यानंतर दंगल उसळली.आता म्हणे जामा मशीद परिसरातून मोठा शस्त्रसाठा पकडल्याची बातमी आली. देशभरात दंगलींचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने कोविड संकटातून आताच कोठे बाहेर पडणाऱ्या लोकांना नव्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल.महाराष्ट्रात भोंगे लावण्यावरून नवहिंदू ओवेसींनी जो वाद निर्माण केला, त्या भोंग्यांवरून देशातील महाभयंकर महागाई व बेरोजगारीचे आकडेही जाहीर झाले पाहिजेत. महागाई व बेरोजगारीचा आक्रोश दडपण्यासाठी ‘भोंगे’ वाजविण्याची शक्कल सुचलेली दिसते.सद्यस्थितीतील   वास्तवावरही शिवसेनेने नेमके  बोट ठेवले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *